सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचा भाजप – सेनेला ‘सल्ला’, म्हणाले …

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – आपापसात भांडण करुन दोघांची हानी होते, हे तत्व सर्वांना लागू आहे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी करत भाजप शिवसेनेला अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मोहन भागवत म्हणाले की, ‘स्वार्थ खूप वाईट गोष्ट आहे हे सर्वांना माहित आहे, पण काही मोजकेच लोक असतात जे स्वार्थ सोडतात. सर्व माणसांना माहित आहे की, निसर्गाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपणचं नष्ट होऊ. पण निसर्गाची हानी करण्याचं काम थांबताना दिसत नाही. तसेच आपापसात भांडण करुन दोघांची हानी होते, तरीही आपापसतील भांडण मिटविण्याचं काम होत नाही. हे तत्व सर्वांना लागू आहे. मग तो व्यक्ती असो किंवा देश.’

गेल्या 30 वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांची युती आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप शिवसेनेत दरी निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला. तर शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढल्याची अधिकृत घोषणाही भाजपनं केली आहे.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like