EVM मशिन्स असलेल्या स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही बंद असल्याने खळबळ

काँग्रेसचा आरोप तर, जिल्हाधिकाऱ्यांकडून फेटाळणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपुर येथील स्ट्रॉंग रूम मध्ये आगामी निवडणुकीकरिता ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र यावेळी तेथील सिसिटीव्ही बंद ठेवण्यात आले होते. असा आरोप काँग्रेसचे नागपूर मतदार सांगतील उमेदवार नाना पटोले यांनी केला आहे. ईव्हीएम मशीन्स स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवत असताना तेथील सीसीटीव्ही चालू असणे अनिवार्य असाते. मात्र असे करीत असताना सीसीटीव्ही बंद होते. याचाच व्हिडीओ एकाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरात निवडणूक होण्यापुर्वीच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, ईव्हीएम मशीन बाबतीत अत्यंत खबरदारी बाळगली जाते. मात्र असे असताना स्ट्रॉंग रूम मध्ये मात्र सीसीटीव्ही बंद करण्यात आले होते. याचा व्हिडीओ देखील हाती आलेला आहे. तसेच नियमानुसार स्ट्रॉंग रूम आणि त्याच्या परिसरातले व्हिडीओ चित्रण करण्यास मनाई आहे. असे असताना देखील याठिकाणी चित्रण केले गेले त्यामुळे अज्ञात व्यक्तीविरोधात दक्षिण नागपूरच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीवर चित्रीकरणास बंदी असतानाही चित्रीकरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, ईव्हीएम मशीन नेत असताना स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही बंद केल्याचे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेले आरोप नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आले आहेत.