Nagpur News । एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून त्यानं केली आत्महत्या, नागपुरात प्रचंड खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  नागपूर (Nagpur News) येथील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील शहरातील तहसील पोलीस स्टेशनच्या (Tehsil Police Station) परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या पाच जणांची हत्या केल्यानंतर एकाने स्वतः आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागपूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. (nagpur news The accused also committed suicide by killing 5 members of the same family)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अधिक माहितीनुसार, नागपूर येथील तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही एक धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (21 जून) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे.
अलोक माटूळकर (Alok Matulkar) असं त्या हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
माटूळकर यांने आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली.
त्या पाच जणांची हत्या करून अलोकने स्वतः आत्महत्या केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अलोक माटूळकर (Alok Matulkar) हे टेलरिंगचे काम करत होते.
ते प्रमोद भिसिकर यांच्या घरी भाड्याने राहत होते.
कौटुंबिक वादातून (Family disputes) हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
अलोक माटूळकर याने आपली पत्नी, मुलगी, मुलगा, सासू आणि मेव्हणीची हत्या केली आहे.
या हत्याकांडामुळे परिसरात आणि नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहे.
मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.
खरतर अलोकने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : nagpur news | after murder of 5 members of same family accuse commits suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Beed News | पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बीड जिल्ह्यातील घटना