Nagpur News | देवेंद्र फडणवीस यांच्या चुलत भावाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन Nagpur News | विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे चुलत बंधू अभिजीत माधवराव फडणवीस यांचे हृदयविकाराच्या (heart attack) तीव्र झटक्याने निधन झाले. अभिजीत यांचे नागपूरमध्ये (Nagpur News) वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले. अभिजीत फडणवीस हे माजी मंत्री आणि भाजपच्या (BJP) ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे एकुलते एक सुपुत्र होते. अभिजीत यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे फडणवीस कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर (Nagpur News) कोसळला आहे.

मूल शहरातील राईस मिल व्यापारी अभिजित फडणवीस हे सध्या नागपुरात वास्तव्याला होते.
मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ते सख्खे चुलत भाऊ होते.
अभिजीत फडणवीस यांच्यावर आज नागपुरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

शोभा फडणवीस या राज्याच्या माजी मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत.
त्यांचे पुत्र अभिजीत माधवराव फडणवीस यांना नागपूरातील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला.
त्यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं.
मात्र तोवर अभिजीत फडणवीस यांची प्राणज्योत मालवली होती.
त्यांच्या अचानक जाण्यानं फडणवीस कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
त्यांच्या पार्थिवावर नागपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असून यावेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

 

Web Title : nagpur news | bjp devendra fadnavis cousin abhijeet fadnavis dies heart attack nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

High Court | विवाहाशिवाय जन्मलेल्या मुलाच्या पित्याचे नाव सांगण्याची नाही आवश्यकता – हायकोर्ट

Cobra Bites | सूप बनवण्यासाठी शेफने ‘कोब्रा’चे केले तुकडे-तुकडे, 20 मिनिटानंतर सापाने घेतला मृत्यूचा बदला!

Pune Crime | धक्कादायक ! नशेचे इंजेक्शन देऊन ‘मॉडेल-रॅपर’कडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, पुण्याच्या हिंजवडीतील घटना