Nagpur News । डॉक्टरनं 16 वर्षीय मुलीसोबत केले अश्लील चाळे; नागपूरातील धक्कादायक घटना

नागपूर न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Nagpur News । नागपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी (Minor girl) डॉक्टरने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवरून शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकारावरून नागपूर शहरातील नंदनवन पोलिसांत (nandanvan police) विनयभंगासह इतर कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टर (doctor) आणि रुग्णालयाचे नाव गुपित ठेवले असून याप्रकरणी तपास पोलीस करीत आहेत. Nagpur News |doctor sexually harassed 16 year old girl who came for treatment crime in nagpur

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याबाबत माहिती अशी की, ही घटना नागपूर शहरातील सद्भावनानगर परिसरातील एका रुग्णालयात घडली आहे. 10 वीत शिकणाऱ्या 16 वर्षीय पीडित मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे ती मुलगी आपल्या आईबरोबर बुधवारी रात्री 8 च्या सुमारास संबंधित रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. यांनतर रुग्णालयात डॉक्टरनं पीडित मुलीची तपासणी करून तिला सलाइन लावली. नंतर काही वेळाने पीडितेची आई रुग्णालयाबाहेर गेली. यांनतर 35 वर्षीय आरोपी डॉक्टर पीडित मुलीजवळ आला. त्यावेळी त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. या घटनेची वाच्यता कुठेही केल्यास जीवे मारण्याची धमकी त्या मुलीला दिली. आणि आरोपी डॉक्टरनं त्या मुलीला डिस्चार्ज दिला. रुग्णालयात घडलेला प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. यावरून पीडितेनं नंदनवन पोलीस ठाण्यात (Nandanvan Police Station) धाव घेतली. यावरून आरोपी डॉक्टर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. परंतु, संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयाचं नाव पोलिसांनी उघड केलं नाही. याप्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस (Nandanvan Police Station) करीत आहेत.

Web Title : Nagpur News | doctor sexually harassed 16 year old girl who came for treatment crime in nagpur

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bank Staff Surprise leave | बँक कर्मचाऱ्यांना मिळणार प्रत्येक वर्षाला 10 दिवस ‘सरप्राइज’ सुट्टी; RBI चा आदेश

Bandra Cyber Police | कॅनडात नोकरी लावतो म्हणून ‘फेक कॉल सेंटर’द्वारे महिलेचे 15 लाख उकळले; पोलिसांनी आरोपीला कोलकात्यातून उचलले

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा मोठा अपघात; ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने 8 वाहनांचे नुकसान