Nagpur News | देवदर्शनासाठी आलेले 5 तरुण नदीत बुडाले, नागपूरमधील घटना

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – देवदर्शनासाठी आलेले पाच तरुण नागपूरमधील कन्हान नदीमध्ये (Nagpur Kanhan River) आंघोळीसाठी उतरले. परंतु नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे पाचही तरुण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस (Digras Yavatmal) येथील होते आणि ते नागपूर (Nagpur News) येथे अम्मा दर्गा (Amma Dargah) येथे दर्शनासाठी आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील 12 तरुण अम्मा दर्गा येथे दर्शनासाठी आले होते. सकाळी 10 च्या सुमारास हे तरुण कन्हान नदीत आंघोळ करण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण बुडू लागला. त्यानंतर एक-एक करुन पाच तरुण पाण्यात बुडाले आणि वाहून गेले. ही घटना कन्हान पोलीस स्टेशनच्या (Kanhan Police Station) हद्दीतील जुन्या कामाठी संकुलात घडली.

आज (रविवार) सकाळी यवतमाळ येथील हे तरुण दर्शनासाठी आले होते. यातील काहीजण आंघोळीसाठी नदीत उतरले. त्यावेळी नदीच्या पाण्याची पातळी जास्त होती तसेच नदीत एक प्रवाह वेगाने वाहत होता. आंघोळीसाठी उतरलेले तरुण मजा करत असताना ते बुडाले. बुडालेल्या तरुणांमध्ये सय्यद लकी (वय-22) अयाज बेग (वय-20), अबुंके बेग (वय-18), सिब्दान शेख (वय-21) खवडजा बेग (वय-17) यांचा समावेश आहे.

हे सर्व तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले असून अद्याप त्यांचे मृतदेह सापडले नाहीत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सध्या घटनास्थळी मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
पाच जणांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली आहे.

Web Title : Nagpur News | five youths drown in nagpur kanhan river

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुणेकरांसाठी गौरवास्पद ! अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी महापौर मुरलीधर मोहोळ

SEBI नं गुंतवणुकदारांसाठी 17 मुद्यांव्दारे जारी केली मार्गदर्शक तत्त्वे, जाणून घ्या डिटेल अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Pune News | ‘विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील’ – माजी आमदार मोहन जोशी