Nagpur News | नागपुरमधील बुटीबोरी येथे 50 खासगी रुग्णालये एकत्र येऊन उभारणार Oxygen प्लांट

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Nagpur News | विदर्भ हाॅस्पिटल असोसिएशनच्या (Vidarbha Hospital Association) पन्नास सदस्यांनी एकत्र येऊन (Nagpur News) बुटीबोरी (Butibori) येथे ऑक्सिजन प्लांट (Nagpur News) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या दुस-या (Corana virus) लाटेची धास्ती लोकांत निर्माण झाली होती. त्या काळात रुग्णांलयात कोरोना रुग्णांना ऑक्सिजन वेळोवेळी उपलब्ध होत नव्हते. आँक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान, संभाव्य तिस-या लाटेचा धोका वर्तवण्यात आला आहे. याचा विचार करता ऑक्सिजन प्लांट (Oxygen plant) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये. या पार्श्वभुमीवर कोर्टाने 50 व त्यापेक्षा अधिक खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांना स्वत:चा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे निर्देश दिले.
मात्र, जागेची कमतरता आणि अनेक खासगी हाॅस्पिटलांना स्वत:चे प्लांट उभारणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नव्हते.
यामधुन मार्ग काढण्यासाठी ‘विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन’च्या (VHA) सदस्यांनी एकत्र जमुन बुटीबोरी एमआयडीसी येथे ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहाय्याने ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा प्रकल्प याच वर्षात सुरू होण्याची अपेक्षा आहे. एकदा प्रकल्प सुरू झाल्यास खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा प्रश्न सुटेल. असं VHA चे अध्यक्ष डॉ. अरबट (Dr. Arbat) यांनी म्हटलं आहे.
तसेच, जागेची कमतरता असताना हॉस्पिटलच्या आवारात प्लांट उभारणे अवघड असून, खर्चिक आहे.
यामुळे सदस्यांनी एकत्र येऊन हा प्लांट उभारण्यास पुढाकार घेतला आहे.
यासाठी बुटीबोरी एमआयडीसीमध्ये (Butibori MIDC) 3 एकरची जागा उपलब्ध झाली असून, प्रकल्पासाठी ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया’कडे (MSME) प्रस्ताव सादर केला आहे.
अशी माहिती VHA चे समन्वयक डॉ. बी. के. मुरली (Dr. B. K. Fife) यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, हा प्लांट उभारण्यासाठी पन्नास सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. या प्लांटमधून १५० हॉस्पिटलना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल.
शिल्लक साठा इतर रुग्णालयांना उपलब्ध करून दिला जाईल.
दिवसाकाठी 1700 जम्बो सिलिंडर ऑक्सिजनची मदत या प्लांटमधून होणार असल्याचं डॉ. आलोक उमरे (Dr. Alok Umre) यांनी सांगितलं आहे.
तर, ऑक्सिजन प्लांटच्या एकूण खर्चाच्या 20 टक्के (अंदाजे 12.5 कोटी रुपये) योगदान सदस्यांनी जमा केले आहे, तर ‘MSME’ कडून बाकी 80 टक्के अनुदान मिळणार असल्याचं डॉ. मुरली यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Nagpur News | oxygen plant be set nagpur 50 private hospitals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | ‘सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

Shivsena BJP Alliance | शिवसेना-भाजपची खरचं युती होणार का? संजय राऊत गौप्यस्फोट करत म्हणाले…

4 लाख रुपयांच्या फायद्यासाठी SBI मध्ये जमा करा दरमहा केवळ 28 रुपये, जाणून घ्या कसा घेऊ शकता लाभ ?