Nagpur News | विदर्भात मुसळधार पाऊस, वीज कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

नागपूर (Nagpur News) : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur News |मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने (Rain) आज अचानक विदर्भात (Vidarbha) हजेरी लावली. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज सायंकाळी जोरदार पाऊस कोसळला. सायंकाळी सुमारास झालेल्या मुसळधार पावसात वीज कोसळून तिघाचां मृत्यू झाला. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील रामटेक येथे ही घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) घडलेल्या या घटनेत एक शेतकरी, गुराखी आणि एका पोलीस पाटलाचा समावेश आहे.

मंगळवारी सायंकाळी अचानक सुरु झालेल्या पावसामुळे पोलीस पाटील, मजूर आणि गुराखी यांनी शेतातील एका झोपडीत आश्रय घेतला. त्याच दरम्यान जोरदार वीज कडाडली आणि झोपडीवर कोसळली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दोघांना रामटेक येथील रुग्णालयात (Ramtek Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांमध्ये एका 12 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

ही घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील चारखुमारी शिवारात मंगळवारी दुपारी तीनच्या
सुमारास घडली. योगेश अशोक कोकणे, मधुकर सावजी पंधराम आणि दिलीप मंगल लांजेवार अशी
मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर हरिसिंग सरोते आणि नेहाल रामसिंग कुमरे हे दोघेजण गंभीर
जखमी झाले आहेत. 12 वर्षीय नेहाल हा शेताजवळ गाई चारत होता.

हे देखील वाचा

Coronavirus | राज्यात गेल्या 24 तासात 10,548 ‘कोरोना’मुक्त, 8,418 नवीन रुग्ण

JEE Mains Exam | JEE Mains परीक्षेच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Nagpur News | three killed in lightning strike in ramtek nagpur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update