वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा डर्टी पिक्चर ! तीन महिला होमगार्डशी अश्लील चाळे

नागपूर :पोलीसनामा ऑनलाइन –  nagpur Police | यशोधरानगर पोलीस (Yashodharanagar Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम (Senior Inspector of Police Ashok Meshram) यांच्याविरुद्ध तीन महिला होमगार्ड (Home Guard ) नी अश्लीलचाळे केल्याची तक्रार पोलीस उपायुक्त निलोत्पल (Deputy Commissioner of Police Nilotpal) यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांना या सर्व घटनेची माहिती दिली. याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी मेश्राम यांना निलंबित (Suspend) केले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांनी १२ जूनला केबिनमध्ये बोलावून २४ वर्षीय महिला होमगार्डला महागडे गिफ्ट घेऊन देण्याचे आमिष दाखवत अश्लील चाळे केले. त्याचबरोबर अन्य दोन महिला होमगार्डशीही मेश्राम यांनी आक्षेपार्ह वर्तन केले. त्यानंतर या तिन्ही होमगार्ड महिलांनी याची तक्रार पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्याकडे गुरुवारी केली. निलोत्पल यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना घटनेची माहिती दिली.

त्यानंतर मध्यरात्री २ वाजन्याच्या सुमारास मेश्राम यांच्याविरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी विशाखा समितीच्या अध्यक्षा पोलीस उपायुक्त विनीता शाहू या करीत आहेत. दरम्यान, सरकारी पिस्तूल व वर्दी पोलीस मुख्यालयात जमा करून मेश्राम यांना मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : nagpur news yashoda nagar police inspector suspended

हे देखील वाचा

Pregnant Women Vaccination | ‘प्रेग्नंट’ महिला सुद्धा घेऊ शकतात व्हॅक्सीन – आयसीएमआर

DRDO नं पिनाक रॉकेटची केली यशस्वी चाचणी; क्षणात शत्रूला करू शकते ‘खाक’ (Video)

खुशखबर ! Taxpayers ला मोदी सरकारकडून मिळाला मोठा दिलासा; Pan-aadhaar ची तारीख सुद्धा वाढली, जाणून घ्या

Paranjape Builders Latest News | शशांक परांजपे आणि श्रीकांत परांजपे पुण्यात परतले, कंपनीकडून देण्यात आलं ‘हे’ स्पष्टीकरण