नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना ‘कोरोना’ची बाधा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतःला आयसोलेट केलं आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी आणि नागरिकांना कोरोनाची टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची सोम्य लक्षण जाणवत होती. त्यामुळं त्यांनी कोरोनाची टेस्ट केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

यापुर्वी नागपूर येथे कार्यरत असताना तुकाराम मुंढे यांना कोरोनाची बाधा झाली होती तर अतिरिक्त पोलिस आयुक्त निलेश भरणे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. राज्य पोलिस दलातील अनेक अधिकार्‍यांना देखील यापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. सध्या नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यांनी स्वतःला आयसोलेट केलं आहे.