गुन्हेगारांना शोधण्यासाठी नागपूर पोलिसाचं ‘Criminal Search App’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांना शोधण्यासाठी नागपूर पोलिसांनी नवा प्रयोग केला आहे. पोलिसांना आणि नागरिकांना गुन्हेगाराची माहिती काही क्षणात मिळावी यासाठी ‘क्रिमिनल सर्च App’ तयार केले आहे. या अॅपमध्ये तब्बल सात लाख गुन्हेगारांचा डेटा फिड करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात पोलिसांना आणि नागरिकांना एका क्लिकवर गुन्हेगाराची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

नागपूर शहरामध्ये चोरी, दरोडे, बलात्कार, सट्टा, जुगार या सारखे गन्हे वाढत आहेत. याव नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर पोलिसांनी हे अॅप सुरु केले आहे. वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे गुन्हेगार देखील हायटेक झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनाही बदलणं भाग असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच नागपूर पोलिसांनी हा नवा प्रयोग केला असून राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

गुन्हेगारांची माहिती पोलिसांना आणि नागरिंकांना तात्काळ मिळावी यासाठी हे अॅप सुरु करण्यात आले आहे. या अॅपमध्ये गुन्हेगारांची कुंडली फिड करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना गुन्हेगारांची माहिती मिळणार असल्याने गुन्हेगारीवर वचक राहिल अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी दिली.

अॅपची वैशिष्ट्ये

सात लाखापेक्षा जास्त गन्हेगार आणि गुन्ह्यांची माहिती. उघडकीस आलेल्या गुन्ह्यांची नोंद. सतत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराचे रेकॉर्ड. गुन्हेगारांच्या नातेवाईक आणि मित्रांचे रेकॉर्ड. गुन्हेगारांचा आधार कार्ड डेटा. गुन्हेगारांच्या बँक खात्याची माहिती.

महिलांनी पालेभाज्या खाल्ल्या तर नेहमी राहतील फिट

वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर

नवाजुद्दीनच्या चित्रपटामध्ये मौनी रॉय ऐवजी येणार ही ‘अभिनेत्री’

दीपिका पादुकोणला ‘या’ खेळाडूवरील बायोपिकमध्ये काम करण्यात ‘रस’

माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास विश्वास नांगरे पाटील आणि CM देवेंद्र फडणवीस जबाबदार – गुणरत्न सदावर्तें यांचा गौप्यस्फोट

राजू शेट्टींना धक्का, स्वाभिमानीच्या पदाधीकाऱ्यांचा सदाभाऊ खोत यांच्या संघटनेत प्रवेश