Nagpur Police | कुख्यात आबू खानला नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 4 राज्यात 35 गुन्हे दाखल असलेल्याला वेश बदलून केलं ‘स्पॉट’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Police |  नागपुरातील कुख्यात गँगस्टर आबू खानला Gangster Abu Khan (वय-51) नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी भंडारा (Bhandara) येथून आबू खानच्या मुसक्या आवळल्या. खान हा मोक्कामधील (MCOCA) Mokka आरोपी असून तो मागील वर्षापासून फरार होता. त्याच्यावर नागपूरसह चार राज्यात 35 गुन्हे (FIR) दाखल आहेत. मागील अनेक दिवसांपासून तो पोलिसांना चकमा देत होता. राज्यातील वेगवेगळ्या शहरात तो फिरत होता. अंमली पदार्थ तस्कर (Drug Smuggler) आबू खानला अटक करण्यासाठी सक्करदरा पोलीस ठाण्यातील (Sakkaradara police station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क शेतमजुराचा वेश धारण केला होता.

 

फिरोज उर्फ आबू खान याच्यावर मध्यप्रदेश (Madhya Pradesh), गुजरात (Gujarat), गोवा (Goa), उत्तराखंड (Uttarakhand) यासह महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक ड्रग्स तस्करीसह मोक्का, चोरी, घरफोडी (Burglary), लुटमार, खून (Murder), जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill), भूखंडावर अवैध ताबा असे गंभीर स्वरुपाचे 35 गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar) यांनी आबूवर मोक्का लावला होता. तेव्हा पासून तो फरार झाला होता.

मागील काही महिन्यापासून पोलीस उपायुक्त नरुल हुसन (DCP Narul Hussain), सहायक पोलीस आयुक्त गणेश बिरादार (ACP Ganesh Biradar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर आवाड (API Sagar Awad), पोलीस अंमलदार नीलेश, नितीन, हेमंत आणि गुन्हे शाखेचे (Crime Branch) दीपक तऱ्हेकर (Deepak Tarhekar) हे आबूच्या मागावर होते. आबू हा भंडारा शहराजवळ असलेल्या बासुरा टोळा या गावातील एका मशिदीजवळ एका घरात लपून बसला होता.

 

माहिती मिळताच शनिवारी दुपारी पथक गावात दाखल झाले. पोलिसांनी शेतमजुरांचा वेश धारण केला. टेहळणी केल्यानंतर रात्रभर पहारा दिला. पहाटे तीन वाजता घेराव घालून आबूला अटक केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कौतूक केले असून 50 हजार रुपयांचे बक्षीस पोलीस पथकाला घोषित केले.

 

दोन भावांना मार्चमध्ये केली अटक

नागपूर पोलीस (Nagpur Police) हे आबू खानच्या मागावर होते. जामिनावर (Bail) बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा दहशत माजवली होती.
शहजाद खान (Shahzad Khan) व अमजद खान (Amjad Khan) या आबूच्या भावांना 15 मार्चला अटक केली.
आबू आणि त्याच्या भावांनी ताजबाग परिसरात काही लोकांच्या जमीनी हडपल्याचा आरोप आहे.
त्यामुळे पोलीस आयुक्तांनी मोक्का अंतर्गत खान बंधूंवर करडी नजर ठेवली होती. त्यानंतर हे फरार झाले होते.
शहजादा खान व अमजद खान यांना अटक केल्यानंतर त्यांच्या घराची तपासणी करण्यात आली.

 

Web Title :- Nagpur Police | nagpur police arrest most wanted criminal abu khan in bhandara mcoca criminal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा