Nagpur Police Recruitment Scam | पोलीस भरतीत मोठा घोटाळा ! भरतीसाठी उमेदवारांकडून 12 ते 15 लाख घेतल्याप्रकरणी तिघे ‘गोत्यात’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nagpur Police Recruitment Scam | नागपूरमध्ये 2021 च्या अखेरच्या तीन महिन्यात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. नागपूरमध्ये राबवण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा (Nagpur Police Recruitment Scam) झाल्याचे उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. भरतीच्यावेळी उमेदवारांच्या जागी वेगळ्याच लोकांनी शारीरिक (Physical) आणि लेखी परीक्षा (Written Exam) दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक संपूर्ण टोळीच अशा पद्धतीने उमेदवारांना पास करुन देण्यासाठी खोटी लोक परीक्षेत बसवत असल्याचा हा प्रकार आहे.

 

नागपूर पोलीस भरती घोटाळा प्रकरणात (Nagpur Police Recruitment Scam) नागपूर गुन्हे शाखेने (Nagpur Crime Branch) तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी औरंगाबादमधील (Aurangabad) असल्याचे समजतेय. ज्या उमेदवारांसाठी यांनी हा सगळा कट रचला, ते उमेदवार देखील औरंगाबाद परिसरातील आहेत. महत्त्वाचे म्हणजे या टोळीने उमेदवारांना गाठून त्यांच्याकडून तब्बल 12 ते 15 लाख रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे.

असा झाला पर्दाफाश
परीक्षा झाल्यानंतर शारीरिक आणि लेखी परीक्षेचे व्हेरिफिकेशन (Verification) करताना पोलिसांना अर्ज भरलेल्या
उमेदवाराचा चेहरा आणि परीक्षार्थींचा चेहरा यामध्ये फरक लक्षात आला आणि हा घोटाळा उघडकीस आला.
सध्या असे 5 उमेदवार लक्षात आले आहे की ज्यांच्या जागी इतर कोणीतरी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला.
या टोळीतील इतर सदस्य, तसेच खोटे उमेदवार (False Candidate) परीक्षेत बसवणारे आणि पोलीस होऊ पाहणारे तरुण,
यांचा आकडा तपासात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय ही टोळी कधीपासून अशा प्रकारे भरती करत होती तसेच कोण कोणत्या परीक्षेत सक्रिय होती हे तपासात उघड होण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title :- Nagpur Police Recruitment Scam | nagpur police recruitment scam rs 12 15 lakh has been taken from the candidates for recruitment three arrest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Court | बलात्कार पीडितेची एकटीची साक्ष शिक्षेसाठी पुरेसा आधार, HC ने प्रत्यक्षदर्शी नसल्याची बाजू फेटाळली, जाणून घ्या काय म्हटले

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा विळखा वाढला, गेल्या 24 तासात 40 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

PMC Online Gunthewari | 10 जानेवारीपासून गुंठेवारीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने केली तयारी

Grahak Peth Pune | ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवात बासमती, आंबेमोहोर, दुबराजपासून इंद्रायणी पर्यंत तब्बल 45 प्रकार; अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी म्हणाल्या – ‘गृहिणींकरीता विविध प्रकारचे महोत्सव ही अनोखी पर्वणी’