नागपूर पोलिसांनी तर कमालच केली, विक्रम ‘लॅन्डर’बद्दल केलं ‘असं’ काही

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – इस्रोच्या विक्रम लँडरबद्दल नागपूर पोलिसांनी ट्वीट केले आहे. नागपूर पोलिसांनी ट्विट करुन म्हटले आहे- “प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद द्या. आम्ही सिग्नल तोडण्याबद्दल तुमचे चलन बनवणार नाही.” नागपूर पोलिसांचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर युजर्सनी प्रतिक्रिया देणेही सुरु केले आहे.

एका युजरने रिप्लाय दिला आहे की – ‘आम्हाला माहित आहे. नागपूर पोलिसही चंद्रावर! ‘ तर दुसऱ्याने म्हटले आहे की ‘ नियम हे नियम ‘आहेत. तर एका युजरने नागपूर पोलिसांच्या ट्विटला दाद देताना म्हटले आहे की, कोट्यावधी भारतीयांच्या भावना विक्रमशी जोडल्या गेल्या आहेत. नागपूर पोलीस, तुमचे ट्विट छान आहे!
reply to NP
22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले चांद्रयान-2 अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत चंद्राजवळ पोहोचले. मात्र, चांद्रयान अवघे 2.1 कि.मी.वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला. त्यावेळी तो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करीत होता.

यापूर्वी रविवारी इस्रोचे अध्यक्ष के. शिवनने सांगितले होते की चंद्रयान -2 अभियानांतर्गत पाठविलेला विक्रम लँडर सापडला आहे. विक्रमचा शोध घेतल्यावर ते म्हणाले होते की त्याने हार्ड लँडिंग केलेली असावी. लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहतील.