‘या’ शहरातील मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानातील महिला व पुरूष ‘चेजिंग’ रूमची पोलिस तपासणी करणार

नागपूर : पोलीसानामा ऑनलाईन – आज नागपुरातील सीताबर्डी बाजारातील एका कपड्यांच्या दुकानात चेंजिंग रुममध्ये कॅमेरा असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या चुप्या कॅमेऱ्याद्वारे महिला आणि तरुणींचे कपडे बदलतानाचे चित्रण करण्यात येत होता. एका तरूणीच्या सावधानगिरीमुळे हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पोलीसांनी कारवाई करत दुकानदार आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. त्यानंतर मात्र पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.

पोलीसांनी सावधानगिरी बाळगत एक निर्णय घेतला आहे. नागपूर पोलीस शहरातील विविध मॉल्स आण कपड्यांच्या दुकांनामध्ये जाऊन चेंजिंग रुम / ट्रायल रूमची तपासणी करणार आहेत. तसंच अनेक नियम झोन-२ च्या पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

हो पोलीस कोणतीही नोटीस किंवा काही पत्रक न देता ही तपासणी करणार आहेत. खरंतर पोलीस साध्या वेशात कधीही ग्राहक बनून दुकानांमध्ये जातील. चेंजिंग रुममध्ये छुपे कॅमेरे लावलेले नाहीत ना यासंदर्भात तपासणी करतील. तसंच आता मॉल्स आणि कापड दुकानांमध्ये काम करणाऱ्या सेल्समन महिला किंवा पुरुष यांचे पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक राहणार आहे, असंही त्यांनी सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त