‘कडू’ बोलणाऱ्यांची ‘माहिती’ आम्हाला द्या, पोलिसांच्या या ट्विटला ‘भन्नाट’ उत्तर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात मकर संक्रांतीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येत आहे. प्रत्येकजण आपल्या जवळच्या व्यक्तींना संदेश पाठवून त्यांना शुभेच्छा देत आहेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला… असा मेसेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्यातील वाद मिटवून आजपासून गोड बोलायला, नव्या मैत्रिला सुरुवात करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

नागपूर पोलिसांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नागपूर पोलिसांनी शुभेच्छा देताना एक मोबाईल नंबरही शेअर केला आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला… असे म्हणत, जर कोणी कडू बोलत असेल तर आम्हाला कळवा असेही नागपूर पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून म्हटलं आहे. नागपूर पोलिसांनी केलेल्या ट्विटला काही भन्नाट रिप्लाय आले आहे.
नागपूर पोलिसांनी केलेल्या ट्विटला एका युजर्सने @Sushils46 या ट्विटर युजर्सला टॅग करत, हा व्यक्ती नागपूरचा असून लोकांचे लग्न मोडायचे काम करतो, ह्यांच्याकडे बघा, असा रिप्लाय पोलिसांच्या ट्विटला दिला आहे. तर एकाने तिळगुळ घ्या पण फेककेस करू नका असे म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/