Nagpur : कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; डोक्यात दगड घालून ब्लेडने कापल्या नसा, हत्याकांडांने उपराजधानीत खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  नागपूर (Nagpur) मध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलाचे अपहरण (Child abduction) करून आरोपीने त्या मुलाचा निर्घृण खून (Murder) केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 11) रोजी पहाटेच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राज उर्फ मंगलू राजकुमार पांडे (वय, 15. रा. आझादनगर एमआयडीसी) (Manglu Pandey) असे मृत मुलाचे नाव आहे. तर सूरज रामभूज शाहू (वय, 25) असे अपहरण करुन खून केलेल्या आरोपीचे (Accused) नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक (Arrested) केली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आरोपीचे एकतर्फी प्रेम

अधिक माहितीनुसार, राज उर्फ मंगलू राजकुमार पांडे याच्या कुटूंबात वडील, आई एक भाऊ आणि एक बहिण तसेच काका आणि त्यांचा परिवार आहे. दरम्यान तेथील आरोपी सुरज शाहूचं आझादनगर (Azadnagar) परिसरातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम (One sided love) होतं. ते लक्षात आल्यानंतर राज पांडेच्या काकांनी (Uncle) आरोपी शाहूला त्या मुलीच्या मागे लागल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिली. यानंतर आरोपी सुरज शाहू राजच्या काकांवर चिडून होता. दरम्यान त्या तरुणीचा विवाह (Marriage) झाला.

बदला घेण्यासाठी मंगलूचे अपहरण

आरोपी बदला घेण्यासाठी संधी शोधत होता. गुरुवारी सायंकाळी राज पांडे SRPF च्या मैदानावर दिसला. त्यावेळी राजला क्रिकेट सामने सुरू असून आपण खेळायला जाऊ असे सांगून त्याला दुचाकीवरून घेऊन गेला. राजला हुडकेश्वर वंजारी कॉलेज नजीकच्या एका निर्जण ठिकाणी नेले. दुचाकीवरुन उतरुन राजला एका लेआऊटकडे घेऊन गेला. तोवर अंधार पडायला सुरवात झाली होती. त्याठिकाणी क्रिकेटचे ग्राऊंड (Cricket ground) दिसत नसल्याने राजने आरोपीला भीती वाटत असल्याचे सांगून माघारी चलण्याचा हट्ट धरला. आरोपीने राजच्या डोक्यात एका मागून एक दगड घातले. राज खाली पडताच आरोपीने निर्घृणपणे त्याला दगडाने ठेचले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने राजच्या हाताच्या नसा ब्लेडने कापल्या.

काकाचे मुंडके कापून व्हॉट्सॲवर फोटो पाठवा

या दरम्यान, राजची हत्या करून शाहूने राजच्या घरच्यांना फोन केला.
राजचे अपहरण (Kidnapping) केले असून तो सुखरूप पाहिजे असेल तर त्याच्या काकाचे शिर (मुंडके) कापून व्हॉटस्अॅपवर (WhatsApp) फोटो (Photo) सेंड करा.
अशी मागणी आरोपीने केली. राजच्या घरचे आरोपीची समजूत काढत बसले.
त्यांनी तातडीने पोलिसांकडे संपर्क केला नाही.
अखेर रात्री नऊच्या सुमार कुटुंबाने एमआयडीसी (MIDC Police) पोलिसांना घटनेची माहिती दिली.

मध्यरात्री आरोपीला बेड्या ठोकल्या

मुलाचे अपहरण आणि भयंकर मागणी ऐकून ठाणेदार युवराज हांडे यांनी लगेच वरिष्ठांना कळवले. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Commissioner of Police Amitesh Kumar), अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके (Additional Commissioner of Police Dr. Dilip Jhalke),
उपायुक्त नुरुल हसन यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली.
अखेर आरोपीला मध्यरात्री बोरखेडीजवळ (बुटीबोरी) पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबूल

पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली.
परंतु तो पोलिसांना माहिती देत नसल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखवला.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याने घटनास्थळ दाखवले. पोलिसांनी पहाटे दोन ते तीन च्या सुमारास राजचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह ताब्यात घेतला.
शवविच्छेदनानंतर राजचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

नागरिकांकडून संताप अन् हळहळ व्यक्त

राज याचे अपहरण करुन निर्घृण खून केल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. नागरिकांनी या घटनेचा संताप व्यक्त करत राजच्या घराजवळ एकच गर्दी केली होती.
राजच्या खूनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली.
राजच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांच्या काळजाचे पाणी झाले.

राज उत्तम गायक

राज हा एक उत्तम गायक (Singer) होता.
त्याची अंत्ययात्रा निघाली अन् त्याच्या गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Video on social media) प्रचंड व्हायरल (Viral) झाला.
त्या व्हिडीओने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.
राजला त्याचे घरचे लोक मंगलू नावाने हाक मारत होते.
अवघ्या 15 वर्षाचा मंगलू खड्या आवाजात गाणे गात होता.
काही दिवसांपूर्वीच त्याने ‘आयेंगी याद… मेरी वफाये… कभी मुझे भूल ना पाओंगे’ हे गीत गायले होते.
या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : uncles revenge nephew arrested accused who kidnapped and murdered minor

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले