धक्कादायक ! फक्त २ हजार रुपयांसाठी मित्राचा खून

नागपूर  : पोलिसनामा ऑनलाईन – उसने घेतलेले पैसे परत न केल्याने मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. अजिंक्य राजेश तेलगोटे असे या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी हत्याप्रकरणात अटक केली आहे. मित्राने उसने घेतलेले दोन हजार रुपये परत न केल्याने त्याने आपल्या मित्राची हत्या केली आहे. रोशन राजेश नगराळे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन राजेश नगराळे आणि  अजिंक्य राजेश तेलगोटे हे दोघे मित्र आहेत. रोशन याने अजिंक्य याच्याकडून दोन हजार रुपये घेतले होते. मात्र अनेकदा मागून देखील त्याने पैसे परत दिले नाहीत. 9 सप्टेंबर रोजी पुन्हा त्याने त्याच्याकडे पैसे मागितले. मात्र रोशन याने त्यावेळी देखील पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भारत अजिंक्य याने लोखंडी रॉड डोक्यात मारून त्याची हत्या केली. त्यानंतर हत्या करून मृतदेह झुडपांमध्ये लपवला आणि त्यावर विटा आणि दगडांचा ढिगारा रचून पलायन केले.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अजिंक्य याला ताब्यात  घेऊन चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. त्यानंतर त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –