रक्षाबंधन विशेष, तरुणाईमध्ये ग्रिटींग राख्यांची क्रेझ, खरदेसाठी मार्केटमध्ये मोठी गर्दी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोणताही सण असो तरुणाई आपल्या जोशात आणि मोठ्या उत्सहात तो सण साजरा करत असते. येणारा रक्षाबांधन हा सणही तरुणाई जल्लोषात साजरा करणार आहे त्याची प्रचीती नजीकच्या बाजारपेठांवरुन दिसून येते. रक्षाबंधन निमित्त सध्या बाजारात राख्यांचे अनेक प्रकार विक्रीसाठी आलेले आहेत आणि त्या प्रमाणे खरेदी विक्रीही सुरु झालेली आहे. सेल्फी घेण्यासाठी कोणती राखी योग्य राहील, आणि मोठ्या भावाला कोणती तर छोट्या भावाला कोणती राखी याचे प्लॅनींग तरुणाईमध्ये सुरु झाले आहे.

रेडिमेड राख्यांसह हॅण्डमेड राख्यांना मोठी मागणी सध्या बाजारपेठेत येत आहे. तर बहिणीला गिफ्ट म्हणून देण्यासाठी ग्रिटिंग कार्ड आणि चॉकलेट्सची खरेदी मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. सध्या ग्रीटिंग आणि राखीचा कॉम्बो पॅक बाजारात उपलब्ध असल्याने तरुणाईमध्ये या प्रकारची क्रेझ आहे. २५ रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत राख्यांच्या किंमत आहेत. राखी प्रकाराला जीएसटी मधून वगळण्यात आलेले असल्यामुळे नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे. गेल्या काही वर्षांपासून हिट ठरलेली ब्रेसलेट राखीची क्रेझ कायम आहे. त्याशिवाय ग्रीटिंग आणि राखी या कॉम्बोला जास्त पसंती आहे. फ्लॉवर राखीसह पॉप-अप आणि चॉकलेट बॉक्सची खरेदीदेखील अधिक आहे.

कपड्याच्या दुकानांमध्ये गर्दी

सुट्टीचा दिवस म्हणून रवीवारकडे पाहिलं जात नुकत्याच येऊन गेलेल्या रविवारी कपड्याच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. रक्षाबांधननिमित्त खरेदीचा ओघ वाढल्याचे चित्र मार्केटमध्ये पाहायला मिळाले. कपड्यांसोबतच चप्पल, बूट, टोप्या अशा प्रकारच्या खरेदीतही वाढ झाल्याचे दिसून आले. सुट्टीच्या दिवशी नवनवीन आणि आकर्षक कपड्याची सजावट दुकानांच्या बाहेर लावण्यात अली होती.

आरोग्यविषयक वृत्त