तिचं दुसरीकडं ‘झेंगाट’ असल्याचं आलं समोर, राग आल्यानं पतीनं पत्नी अन् प्रियकराचा केला ‘गेम’ खल्लास

पोलिसनामा ऑनलाईन टीम – दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूनंतर नागपूरात आज पुन्हा अनलॉक करण्यात येणार असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधाच्या रागातून पतीने पत्नीसह प्रियकराचा खून केला. ही घटना बेसा परिसराच्या कल्यानेश्वर नगर इथे घडली आहे.

किरण बरमेया आणि प्रेमी शिव अशी खून करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पती भारत बरमेयला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला आला. त्यातून पती-पत्नीमध्ये रोज भांडण व्हायला लागले होते. रागातून पत्नीसह प्रियकराचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे नागपूर शहर हादरले असून मोठी खळबळ उडाली आहे.

नागपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले आहेत. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या रागातून पतीने पत्नी किरण बरमेया आणि प्रेमी शिवची निर्घृण हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.