गॅंगवारचा भडका ! कुख्यात ‘गॅंगस्टर’ कार्तीक तेवरचा मध्यरात्री खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूरातील कुख्यात गुंडाचा पार्टी करून परतत असताना झालेल्या वादातून खून केल्याचा प्रकार काल मध्यरात्री घडला आहे. दरम्यान हा खून गॅंगवारमधून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

कार्तिक तेवर याचा त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनीच झालेल्या वादातून खून केला. त्याच्या खूनप्रकऱणी काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यावरून हा खून गॅंगवारमधून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कार्तिक तेवर हा नागपूरमधील सराईत गुंड आहे. काल रात्री पाचगावच्या एका फार्म हाऊसमध्ये पार्टी करण्यासाठी काही तरुण गेले होते. त्यावेळी कार्तिक तेवर हा देखील त्यांच्यासोबत होता. मध्यरात्री पार्टी संपवून तो परतत होता. त्यावेळी पार्टी करून येताना सर्व हल्लेखोर त्याच्यासोबत होते. त्यादरम्यान त्यांच्यात काही कारणावरून बाचाबाची झाली. त्यातूनच सर्वांनी बिअरच्या बाटल्यांनी मारहाण करून त्याचा खून केला. पोलिसांनी याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले आहे. तर काही जण अद्याप फरार आहेत.

ताब्यात घेतलेले सर्व तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे हा खून वर्चस्ववादातून करण्यात आला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

You might also like