अार्ची-परशामुळे मनसेचे इंजिन सुसाट धावणार का?

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

दिगदर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमामुळे आर्ची आणि परशा हे नाव सर्वोपरिचित झाले. दिग्दर्शक नागराज मंजुळे राजकीय पक्षाच्या जवळ गेला आहे. नागराज मंजुळेने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचं सभासदत्व स्वीकारलं आहे. केवळ नागराजनेच नाही तर सैराट सिनेमा गाजवलेला परशा अर्थात आकाश ठोसर आणि आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुही ‘मनसे’चं सभासदत्व स्वीकारलं आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L,B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f6e4556a-b5b4-11e8-9cbd-0128130517c9′]

या सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शशांक नागवेकर, उपाध्यक्ष शर्वणी पिल्लई आणि उमा सरदेशमुख यांच्या उपस्थितीत चित्रपट सेनेचे सभासत्व स्वीकारले.

नागराजच्या सैराट सिनेमाने केवळ मराठी सिनेमाच नव्हे तर बॉलिवूडचंही लक्ष वेधून घेतलं. अनेक भाषेत या चित्रपटाची निर्मिती झाली. नुकताच करण जोहरचा धडक हा सैराटचा हिंदी रिमेक येऊन गेला. या सिनेमालाही बॉलिवूडकरांनी दाद दिली. इतकंच नाही तर दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन झळकणार आहेत.
[amazon_link asins=’B01BKEZYBY,B01N0WVC16′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fca2ab61-b5b4-11e8-afaa-2f243b667a04′]

नागराजचा फँड्री ते बॉलिवूड व्हाया सैराट हा प्रवास थक्क करणारा आहे. त्यामुळे सिनेइंडस्ट्रीमध्ये नागराजची क्रेझ सध्या पाहायला मिळत असताना, आता नागराजने मनसे चित्रपट सेनेचं सभासदत्व स्वीकारल्याने, राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

पोलीसनामा न्युज
ब्रेकिंग न्यूज तसेच राज्यातील आणि देशविदेशातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पोलिसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा… आणि मिळवा पोलीसनामा च्या प्रत्येक बातमीची लिंक
 https://t.me/policenamanews