Nagraj Manjule | जाळ अन् धूर संगटच नागराज मंजुळेंनी सांगितला लंडनच्या हॉटेलमधील ‘तो’ किस्सा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Nagraj Manjule | सध्या वर्धा येथे 96 वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच 17 वा विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अनेक ज्येष्ठ कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये मराठीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule), अभिनेते सयाजी शिंदे, किशोर कदम आणि लोकप्रिय लेखक अरविंद जगताप यांनी आपले काही अनुभव प्रेक्षकांसमोर सांगितले. यावेळी नागराज मंजुळे यांनी सांगितलेला किस्सा सध्या चर्चेत आहे.

 

नागराज मंजुळे हे सिनेमातून बोलतात असे म्हटले जाते. त्यांच्या शांत स्वभावामुळे त्यांची जास्त ओळख आहे. मात्र जेव्हा ते बोलायला लागतात तेव्हा काहीतरी रंजक हे ऐकायला नक्कीच मिळते. या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांनी लंडनमध्ये झालेला त्यांच्यासोबतचा एक मजेशीर किस्सा सांगितला. जो ऐकून उपस्थितांना खळखळून हसायला भाग पाडले.

यावेळी बोलताना नागराज (Nagraj Manjule) म्हणाले की, “ज्यावेळी मी पहिल्यांदा लंडनला गेलो होतो तेव्हा माझ्यासोबत एक मजेशीर प्रसंग घडला. भारतात असताना कधी पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्याचा योग आला नाही. मात्र तो लंडनमध्ये घडून आला. मी आणि माझे दोन निर्माते मित्र एका हॉटेलमध्ये गेलो. आम्ही सकाळी नाष्टा करून चित्रपट महोत्सवासाठी बाहेर जात असे. माझे दोन मित्र चहा बनवत असे. मात्र एके दिवशी सकाळी मित्र खोलीमध्ये आलेच नाही. त्यामुळे म्हटलं मी स्वतः चहा बनवावा.

 

याआधी मी कधीच इलेक्ट्रिक टी मेकर हाताळला नव्हता आणि खोलीमध्ये चहा बनवण्यासाठी एक इलेक्ट्रिक टी मेकर होता.
प्रयत्न म्हणून मी त्या इलेक्ट्रिक टी मेकर मध्ये चहा बनवण्याचा प्रयत्न केला.
त्या मेकर मध्ये पाणी टाकलं प्लग सुद्धा जोडला आणि तो मेकर थेट उचलून शेगडीवर ठेवला आणि आता म्हटलं चहा होईपर्यंत व्यायामाला लागतो.
व्यायाम करताना माझं लक्ष शेगडीकडे गेलं तर मला दिसलं त्या टी मेकर मधून धूर बाहेर येत होता
आणि या धुरामुळे खोलीतील सायरन वाजायला सुरुवात झाली. यामुळे मी प्रचंड घाबरलो”.

 

पुढे बोलताना ते म्हणाले, “सायरन वाचताच हॉटेलमधील स्टाफ धावत माझ्या खोलीपर्यंत आले आणि काय झालं हे विचारू लागले.
मात्र आता मला त्यांना इंग्रजी मधून काय सांगता येत नव्हते.
पण एकंदरीत परिस्थिती पाहून त्यांच्या लक्षात आलं होतं की काय झालं ते.
त्यांनी तात्काळ मला नवीन टी मेकर आणून दिला. शिवाय मला त्यांनी इलेक्ट्रिक टी मेकर हाताळण्याची पद्धत देखील दाखवली”.
हा मजेदार किस्सा ऐकवताच संमेलनात एकच हसू उडाले.

 

Web Title :- Nagraj Manjule | akhil bhartiy sahitya sammelan director nagraj manjule told funny story in london hotel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर देखील नाना पटोले कसबा विधानसभा पोटनिवडणुक लढविण्यावर ठाम; म्हणाले…

Pune Bypoll Elections | कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रे निश्चित

Pervez Musharraf Passes Away | पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास