‘रितेश – नागराज’ साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची ‘महागाथा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख चित्रपट बनवणार असल्याची चर्चा मागील काही वर्षापासून सुरु होती. आज शिवजयंतीनिमित्त या चित्रपटाची औपचारिक घोषणा करण्यात आली. नागराज मंजुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचा टीझर नागराज मंजुळेनी ट्विट केला आहे.

एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजेच हेच असावं कदाचित असे म्हणत नागराजने 30 सेकंदाचा टीझर पोस्ट केला आहे. आपल्या ट्विटमध्ये नागराजने लिहिले की आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्त हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी… शिवाजी… राजा शिवाजी… छत्रपती शिवाजी (हा चित्रपट).

या ट्विटमधून नागराजने शिवभक्तांना शिवरायांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.