नवीदिल्ली : वृत्तसंस्था – 19 वर्ष एक शिक्षक मुलांना मुका असून देखील शिकवत राहिला आणि अचानक एके दिवशी त्याचा आवाज पुन्हा परत आला. हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. 19 वर्षांपूर्वी गोपालचंद यांचा आवाज गेला त्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या मोठ्या ठिकाणी इलाज केला मात्र काही फरक पडला नाही आणि आज गोपाल चंद यांचा आवाज अचानक परत आला.
चमत्कार की अजून काही
शिक्षकाचा आवाज परत आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे त्यामुळे याला चमत्कार म्हणावे की अजून काही असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला आहे. गोपाल यांना देखील हा एक चमत्कारच वाटत आहे.
मुके असून देखील गोपाल हे शाळेमध्ये मुलांना हिंदी शिकवतात सध्या ते पहिल्यापेक्षा अधिक स्पष्टपणे बोलू शकणार आहेत आणि मुलांना समजवू शकणार आहेत.
त्यांनी सांगितले की यापूर्वी ते ब्लॅकबोर्ड व कागदावर लिहून मुलांना शिकवायचे. आता मुलांना समजवण्यासाठी कमी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, बोलता येत नसले तरीही मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता नव्हती आणि त्यांचा परीक्षेचा निकाल 80 टक्क्यांहून अधिक राहिला आहे, पण आता आवाज आल्यावर मुलेही खुश आहेत.
पीजीआय मध्ये केला इलाज
गोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आवाज गेल्यानंतर त्यांनी चंदिगढ येथील पीजीआय मध्ये आपला इलाज केला होता. यादरम्यान डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या व्होकल कॉडमध्ये खराबी आहे. त्यामुळे त्यांना उपचार घेऊन काही फायदा झाला नाही मात्र डॉक्टरांनी सांगितले होते की, भविष्यात त्यांचा आवाज परत येऊ शकतो. अनेक वर्षानंतर आलेला आपला आवाज हा गोपाल यांना चमत्कार आणि ईश्वराची कृपा असल्यासारखा वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
- ‘ही’ आहेत कानाच्या ‘कॅन्सर’ची 7 लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष !
- दर 20 मिनिटांनी ‘वॉक ब्रेक’ घ्या, हृदयरोग असूनही मिळेल ‘लाँग लाईफ’ !
- ‘या’ 5 पदार्थांमुळे वाढतो ‘ताण’; मेंदूसाठीही ठरतात घातक !
- ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळवा खोकल्यापासून सुटका !
- ‘नागीण’ आजाराची ‘ही’ आहेत 4 कारणे, जाणून घ्या यावरील उपाय
- बहुगुणकारी ‘लवंग’ चे सेवन करा आणि ‘या’ 5 समस्यांतून मुक्तता मिळवा
- ‘न्यूमोनिया’ वर गुणकारी ठरतात ‘हे’ 5 घरगुती उपाय !