जाणून घ्या : भारत सरकारचा ‘नई मंजिल’ उपक्रमाबाबत, ज्याचा 50 हजारपेक्षा जास्त महिलांनी घेतला ‘लाभ’

जिनिव्हा : नई मंजिल हा भारत सरकारच्या अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालयाद्वारे चालवण्यात येणारा उपक्रम आहे, ज्यामुळे अनेक महिलांनी आपल्या जीवनात नवी पहाट अनुभवली आहे. या उपक्रमांतर्गत त्या महिलांना शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली जाते ज्या काही कारणास्तव पूर्ण करू शकत नाहीत. त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन पायावर उभे राहण्यासाठी मदत केली जात आहे.

या कार्यक्रमांतर्गत पहिली बॅच 2017 मध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण करून समोर आली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत 50 हजारपेक्षा जास्त अल्पसंख्यांक महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यात आले आहे. जागतिक बँकेने या कार्यक्रमासाठी 5 कोटी डॉलरचे कर्ज दिले आहे. हा कार्यक्रम देशातील 26 राज्यात आणि 3 केंद्र शासित प्रदेशांमध्ये सुरू आहे.

भारत सरकारचा हा कार्यक्रम महिलांना सशक्त करण्यासाठी एक वेगळी सुरूवात आहे. संयुक्त राष्ट्राच्या वृत्तात जागतिक बँकेच्या वरिष्ठ शिक्षण तज्ज्ञ मार्गारेट क्लार्क आणि शिक्षण सल्लागार प्रद्युम्न भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या ब्लॉगचा संदर्भ देत त्या महिलांची कथा शेयर केली आहे, ज्यांनी याद्वारे आपले जीवन सावरले आहे.

समीरा त्या महिलांपैकी एक आहे, जिने या उपक्रमांतर्गत खुप काही शिकले आणि आपले जीवन सावरले. समीराचे आई-वडील गरीब होते. 14 वर्षाच्या वयातच समीराने शिक्षण सोडले होते. यानंतर तिचे लग्न झाले आणि ती पतीच्या घरी केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात गेली. तिचा पती मच्छिमारीशी संबंधीत आहे. लग्नानंतर समीरासुद्धा इतर महिलांप्रमाणे कामात गुरफटत गेली. कुटुंबाचे खाणे-पिणे, घराची साफसफाई करणे, एवढेच तिचे जीवन झाले. मग एकेदिवशी त्यांच्या येथे भारत सरकारचा कार्यक्रम ‘नई मंजिल- नव क्षितिज’ नवाच्या कार्यक्रमाने प्रवेश केला.

समीराने या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जेव्हा पतीची परवानगी मागितली तेव्हा त्याने सुद्धा परवानगी दिली. ही सुरूवात तिच्यासाठी खुप खास होती. तिने या कार्यक्रमात टेलरिंगचे काम शिकले आणि सुमारे दिड वर्षानंतर तीन इतर महिलांसोबत मिळून आपले एक टेलरिंगचे दुकान सुरू केले. या दुकानाचे नाव त्यांनी बिस्मिल टेलरिंग ठेवले. काही कालावधीनंतर तिचे काम चांगले चालू लागले. तिथे राहणार्‍या मच्छिमार समाजाचे तिच्याकडे खुप काम येऊ लागले. समीरानुसार लोकांना तिचे काम पसंत पडू लागले आणि तिची कमाई सुद्धा वाढली. मात्र, कोविड-19 ची सुरूवात झाल्यानंतर लॉकडाऊनचा परिणाम झाल्याने काम मिळणे बंद झाले. यामुळे सर्वत्र निराशा पसरली होती.

क्लार्क आणि भट्टाचार्य यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, चार महिन्यानंतर जेव्हा त्यांची समीराशी चर्चा झाली होती, तेव्हा तिच्या आवाजातून आनंद स्पष्ट जाणवत होता. तिने सांगितले की, लॉकडाऊन संपताच तिला मास्क बनवण्याची ऑर्डर मिळाली होती. समीरानुसार तिला अगोदर यावर विश्वास बसत नव्हता, पण ते खरे होते. तिच्या दुकानात कारागिर सुद्धा येत नव्हते.

लॉकडाऊननंतर तिचे छोटे दुकान पुन्हा एकदा नफ्याकडे वाटचाल करू लागले आहे. तिचा जोशपूर्ण आवाज आणि आत्मविश्वासाने आम्ही दोघेही खुप हैराण आणि आनंदी होतो. या कार्यक्रमातून समीरामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाला आणि जे तिने मिळवले, त्यातून कार्यक्रमाचे सार्थक झाले. समीराला वाटत होते की, आता ती कठिण काळातून बाहेर पडू शकते. लॉकडाऊनच्या दरम्यान घराची स्थिती खुपच बिघडली होती. तिचा पतीसुद्धा समुद्रावर मासेमारीसाठी जाऊ शकत नव्हता, परंतु आता तिचे दिवस पुन्हा एकदा बदलले आहेत.

समीराप्रमाणे कौसर जहां सुद्धा या कायक्रमातून आपल्या पायावर उभी राहीली आहे. हैदराबादमध्ये राहणार्‍या कौसरची तीन मुले आहेत. तिच्या कुटुंबात एकुण नऊ सदस्य आहेत. तिचे अवघ्या 17 वर्षाच्या वयात लग्न झाले होते. त्यामुळे शिक्षण सुटले होते. नई मंजिल कार्यक्रमामुळे तिने शिक्षण घेतले आणि नंतर तिला सरकारी दवाखान्यात कामही मिळाले. कोविड-19 मुळे सर्व बंद असताना आणि लोकांचा रोजगार बंद झालेला असताना कौसरला हॉस्पीटलमधून उत्पन्न सुरू असल्याने तिला एक आत्मविश्वास मिळाला.

या कामामुळे लॉकडाऊनमध्ये ती तिच्या कुटुंबाचे पोट भरू शकली. लॉकडाऊनमध्ये हॉस्पीटलमध्ये येण्यास मनाई असली तरी तिला अर्धा पगार मिळत होता.

या कार्यक्रमाचा लाभ घेणार्‍या कौसर आणि समीराप्रमाणे इतरही महिला आहेत. या महिला आज हैद्राबादच्या जुन्या परिसरात होणार्‍या वॅक्सीनेशन प्रोग्राम, टेस्ट रिपोर्ट समजावणे, रक्तदाब तपासणे आणि आजारी लोकांना डॉक्टरांकडून सल्ला देणे यासारख्या सेवा करत आहेत.