6000 रुपयांची लाच स्विकारताना नायब तहसिलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – वडिलोपार्जित शेतजमिनीचे हिस्से वाटपाचे प्रकरण पूर्ण करून देण्यासाठी 6 हजार रुपयांची लाच स्विकारताना पेठ तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार बाळासाहेब भाऊराव नवले याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज पेठ येथील तहसिल कार्य़ालयात करण्यात आली. या कारवाईमुळे तहसिल कार्यालयात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीचे हिस्से वाटपाचे प्रकरण पुर्ण करून देण्याच्या मोबदल्यात नायब तहसिलदार बाळासाहेब नवले याने तक्रारदाराकडे 6 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतबिंधक विभागाकडे तक्रार केली.

अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता नवले याने लाचेची मागणी करून ती स्विकरण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आज (शुक्रवार) पेठ तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार कार्यालयात सापळा रचण्यात आला. नवले याला तक्रारदार याच्याकडून सहा हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –