‘भारत-पाक’ सैन्यातील गोळीबारात नगरचे जवान सुनील वाल्टे शहिद !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि भारतीय सैनिकांत गोळीबार झाला. यावेळी पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना कोपरगाव तालुक्यातील दहीगावचे जवान सुनील रावसाहेब वाल्टे यांना वीरमरण आले आहे. सुनील वाल्टे हे 40 वर्षांचे असून ते लष्करात नायब सुभेदार होते.

सुनील वाल्टे लवकरच सेवानिवृत्त होणार होते. त्यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुदत वाढवून घेतली होती. ती मुदतही संपत आली होती. सुनील वाल्टे यांच्यामागे त्यांच्या कुटुंबात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे आईवडिल शेतकरी आहे. वाल्टे यांची मुलगी नववीत शिकत आहे. तर मुलगा 5 वर्षांचा आहे.

देशातील विविध ठिकाणी सेवा देणाऱ्या सुनील वाल्टे यांना नुकतीच बढती मिळाली होती. ते नायब सुभेदार झाले होते. मंगळवारी झालेल्या कारवाईत वाल्टे गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र यावेळी त्यांनी आपले प्राण गमावले. वाल्टे यांनी दहिगावमध्येच प्राथमिक शिक्षण घेतले होते. त्यांनी आपले 12 वी पर्यंतचे शिक्षण कोपरगावमध्ये पूर्ण केले होते. यानंतर ते सैन्यात भरती झाले होते.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like