नायब तहसीलदार बाळासाहेब वांजरखेडकर यांचे निधन

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन – अंबाजोगाई येथील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बाळकृष्ण (बाळासाहेब) नारायणराव वांजरखेडकर यांचे  (दि. १९) पहाटे ४ वाजता राहत्या घरी ऱ्हदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते.

नोकरीच्या सुरूवातीस बाळासाहेब वांजरखेडकर यांची माजलगाव येथील तहसील कार्यालयात लिपीक पदावर नेमणूक झाली होती. त्यानंतर पेशकार आणि पदोन्नतीने सध्या अंबाजोगाई येथे नायब तहसीलदार पदावर ते कार्यरत होते. माजलगाव, अंबाजोगाई, धारूर या ठिकाणी त्यांनी सेवा बजावलेली आहे. मनमिळाऊ स्वभाव आणि कर्तव्यदक्षतेमुळे अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरीक असे सर्वांशीच त्यांचे स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळासाहेब वांजरखेडकर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.