India-Nepal Border Dispute : नेपाळचे धाडस वाढले , सीमेवर आणखी 3 BPO चौक्या उघडल्या

पिथौरागड / झुलाघाट : वृत्तसंस्था – सीमेपर्यंत तयार करण्यात आलेल्या गरबधार-लिपुलेख रस्त्याला अतिक्रमण असल्याचे सांगणाऱ्या नेपाळने उंच हिमालयाच्या छांगरुनंतर झूलाघाट आणि पंचेश्वरमध्ये बीओपी चौकी (सीमेवरील आऊट पोस्ट) सुरु केले आहे. लालीमध्ये चौकी सुरु करण्यात आली आहे. तर भारत नेपाळ आंतरराष्ट्रीय पुलाशेजारी भाड्याच्या घरात झुलाघाट येथील चौकीसाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. या ठिकणी शुक्रवारी सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. एका आठवड्यातच नेपाळ सशस्त्र दलाचे जवान पंचेश्वरमध्ये तैनात होतील. लालीमध्ये बीओपी चौकीचे काम सुरु झाले असून या ठिकाणी जवानांना तैनात करण्यात आले आहे.

नेपाळमधील उंच हिमालयातील छांगरू येथे नेपाळ सशस्त्र सेनेची बीओपो चौकी उघडल्यानंतर नेपाळमधील पिथौरागडच्या सीमेवर आणखी तीन बीओपी चौकी स्थापन करण्यात आल्या आहेत. जळजीवी-झुलाघाटच्या मध्यभागी लाली येथे नेपाळ सशस्त्र सेनेने बीओपी चौकीचे काम सुरु केले आहे. नेपाळचा लाली परिसर भारतातील पेपली प्रदेशाच्या समोर आहे. झुलाघाट येथील आंतरराष्ट्रीय पुलाशेजारी तीन मजली घर भाड्याने घेण्यात आले आहे. या चौकीवर शुक्रवारी सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. हा परिसर नेपाळमधील दशरथ चंद नगर पालिका प्रभाग क्रमांक 8 मध्ये येतो.

पंचेश्वर येथील नेपाळची बीओपी चौकी रोवळधर येथील गावात उघडण्यात येत आहे. याठिकाणी घर भाड्याने घेतले आहे. या ठिकाणी आठवड्याभरात सैनिक तैनात केले जाणार आहेत. सीमेवर असलेल्या दार्चुलामधील खलंगामध्ये यापूर्वीच बीओपी चौकी उभारण्यात आली आहे. छांगारु, खलंगा आणि लाली बीओपी चौकी नेपाळच्या दार्चुला जिल्ह्यात आणि झुलाघाट आणि पंचेश्वरी चौकी बैतारी जिल्ह्यात येते. दार्चुला जिल्ह्यातील चौकी ही नेपाळ सशस्त्र दलाची 50 वी बटालियन आहे आणि बैत्रीच्या दोन्ही चौक्या या 51 व्या बटालियनच्या सैन्याच्या चौक्या आहेत.