बकरी चोरीच्या कारणावरून काढली 2 मुलांची नग्‍न धिंड, परिसरात खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीत एक खळबळजनक घटना घडली आहे. बकरी चोरी प्रकरणी या ठिकाणी लोकांनी दोन अल्पवयीन मुलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढली आहे. या घटनेचा खळबळजनक व्हिडीओ येताच पोलिसांनी तत्काळ 6 जणांना अटक केली आहे.

पोलीस प्रशासनाचा धाक कमी झाल्यामुळे यूपीतील वाराणसी जो की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे या ठिकाणी लोकांनी दोन मुलांवर स्वतः कारवाई करत त्यांची धिंड काढली आहे. वाराणसी मधील शिवपुर ठिकाणी ही घटना घडली आहे.

वाराणसी में 2 दलित किशोरों को बकरी चोरी के आरोप में नंगा कर घुमाया

दोन अल्पवयीन मुलांना बकरी चोरीच्या आरोपावरून त्यांच्याच शेजाऱ्यांनी कपडे काढायला लावले आणि हात मागे बांधून आजूबाजूच्या परिसरातून त्यांची नग्न धिंड काढली. सोमवारी हि घटना घडली मात्र मंगळवारी या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यावर पोलिसांनी पीडितांच्या तक्रारवरून सहा जणांना अटक केली आहे. दोघेही पीडित दलित समाजातील असून कांशी राम आवास योजनेमध्ये शेजारीच राहत होते.

वाराणसी में 2 दलित किशोरों को बकरी चोरी के आरोप में नंगा कर घुमाया

Visit : Policenama.com