Nal Stop Flyover Pune |  दुहेरी उड्डाणपुलानंतर देखील वाहतुक कोंडी, प्रायोगिक तत्वावर उपाय योजना करणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Nal Stop Flyover Pune |  वाहतूक कोंडी (Traffic Jam) सोडवण्यासाठी कर्वे रस्त्यावर (Karve Road) नळस्टॉप चौकात महापालिकेकडून Pune Corporation (PMC) उभारण्यात आलेल्या शहरातील पहिल्या दुहेरी उड्डाणपूल (Nal Stop Flyover Pune) उभारण्यात आला आहे. मात्र, या मार्गावरील वाहतुक कोंडीत फारसा फरक पडलेला नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासन, वाहतुक पोलीस (Pune Traffic Police) यांची संयुक्त बैठक झाली. यामध्ये प्रायोगिक तत्वावर काही उपाय पुढील दिवसांत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे शहरामध्ये मेट्रो (Pune Metro) मार्गाची उभारणी करण्याचे काम सुरु आहे.

 

नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या भागात मेट्रो मार्ग आणि इतर वाहनांसाठी एक असा दुहेरी उड्डणपुलाची उभारणी (Nal Stop Flyover Pune) करण्यात आली. हा उड्डाणपूल कर्वे रस्त्यावरुन गरवारे महाविद्यालयाकडून (Garware College) पौड फाटा चौकाच्या (Paud Fata Chowk) दिशेने जाताना संध्याकाळी एसएनडीटी महाविद्यालयाजवळ (SNDT College) वाहतूक कोंडी होत आहे. त्याचप्रमाणे सकाळी पौड फाटा येथून डेक्कनच्या (Deccan) दिशेने जाताना रांका ज्वेलर्स चौकात (Ranka Jewelers Chowk) वाहतूक कोंडी होत असल्याचे पहायला मिळत आहे.

 

वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी महापालिकेचा वाहतुक नियोजन विभाग (PMC Transportation Planning Department) आणि वाहतुक पोलीस यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत आणि संयुक्त पाहणीनंतर काही उपाय योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुलाच्या खालील जागा पे अँड पार्क (Pay and Park) तत्वावर उपलब्ध करुन देण्याची मागणी या भागातील दुकानदार आणि व्यावसायिकांनी केली आहे. याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या सर्व विषयांवर या बैठकित चर्चा करण्यात आली.

नळस्टॉप चौकात वाहन चालकांना यु टर्न करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
याशिवाय कर्वे रस्त्याला एसएनडीटी येथे येऊन मिळणारा एक छोटा रस्ता थेट कालव्यावरील रस्त्याला जोडण्याच्या उपायावर चर्चा करण्यात आली.
एसएनडीटी भागात असलेल्या बसथांब्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली.
पौड आणि कर्वे रस्ता या दिशेने जाणाऱ्या बसेसकरीता वेगवेगळे थांबे करण्यात येणार आहेत.

 

…तरच वाहतूक कोंडी सुटेल
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दुहेरी उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
मात्र या भागातील वाहतुक कोंडी सुटलेली नाही. सध्या मेट्रोचे काम सुरु असून काही ठिकाणी बांधकामाचा राडारोडा पडलेला आहे.
तसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कर्वे रस्त्याला येऊन मिळणाऱ्या लहान रस्त्यावरील वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.
अशा काही उपाय योजना केल्या तरच येथील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल असा विश्वास महापालिका प्रशासनाला आहे.

 

 

Web Title :- Nal Stop Flyover Pune | Traffic Jam On Nal Stop Flyover Pune Corporation PMC Pilot Project Pune Traffic Police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा