Nalasopara Crime | नालासोपाऱ्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2.5 लाखांचे कंडोम जप्त; एक तृतीयपंथी अन् तिघींची सुटका

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन – Nalasopara Crime News | मुंबईच्या जवळ असलेल्या नालासोपाऱ्यात एका चाळीत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (prostitution exposed) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी डांबून ठेवलेल्या चार तरुणींची सुटका (Nalasopara Crime) करुन दोघांना अटक (Arrest) केली आहे. यामध्ये एका तृतीयपंथीयाचा (transgender) समावेश आहे. मुंबईतील (Crime in Mumbai) नालासोपाऱ्यातील वालीव पोलिसांना (Waliv Police) वेश्या व्यवसायाची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा (Raid) टाकून चार तरुणींची सुटका करुन लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नलासोपारा पूर्व परिसरातील पेल्हार गावात खान कंम्पाउंडमध्ये (Khan Compound Pelhar) वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती वालीव पोलीस ठाण्यातील (Waliv Police Station) अधिकाऱ्यांना समजली. मिळालेल्या माहितीची पोलिसांनी शाहनिशा केली. त्यावेळी खान कंम्पाउंडमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समजले. पोलिसांनी या ठिकाणा छापा टाकून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. दरम्यान, पोलिसांनी चाळीतील एका खोलीत डांबून ठेवलेल्या चार तरुणींची सुटका केली. पोलिसांनी अटक कलेले आरोपी या महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती समोर आली.

वालीव पोलिसांनी वसुंधरा संजय तिवारी (वय-48) आणि अंजली राजकुमार यादव (वय-45) यांना
अटक केली आहे. वसुंधरा तिवारी ही तृतीयपंथी आहे. दोन्ही आरोपी पीडित तरुणींकडून
जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत होते. दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत (police custody)
असून पोलीस त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत.

2.5 लाखांचे कंडोम जप्त

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 2 लाख 53 हजार 440 रुपये किमतीचे कंडोम्स (Condoms) असलेले 22 मोठे बॉक्स, रोख रक्कम,
मोबाईल फोन जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास
वालीव पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime | कोंढव्यात टोळक्याकडून 2 तरुणांवर कोयत्याने वार, एकाला अटक

कोरोनाच्या संचारबंदीत सिंहगड पायथ्याशी ‘छमछम’, 10 जणांवर FIR; आंबेगावमधील प्रसिद्ध डॉक्टर फरार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Nalasopara Crime | prostitution exposed in nalasopara two and a half lakh worth condoms seized 4 young women released mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update