कोर्टातील खटला लढविण्यासाठी पैसे नसतील तर तुम्हाला ‘फ्री’मध्ये वकिल मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला न्यायालयीन लढाई करायची असेल आणि तुम्ही वकील घेण्यास सक्षम नसाल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्याकडे यासाठी पैसे नसतील तर सरकार तुम्हाला फ्रीमध्ये वकील उपलब्ध करून देणार आहे. यासाठी संसदेने विधिक सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ मंजूर केला आहे. यामध्ये गरीब नागरिकांना मोफत कायदेशीर मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने देखील मोफत कायदेशीर मदत देण्याचे आदेश दिले आहेत.

सांकेतिक तस्वीर (Courtesy- nalsa.gov.in)

त्यामुळे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३९ अ मध्ये सांगण्यात आले आहे कि, यासाठी राज्यात अशा प्रकारची कायदेशीर व्यवस्था उभारण्यात यावी. त्यातून गरीब आणि गरजू नागरिकांना मदत मिळेल. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि काही इतर कारणांमुळे हे नागरिक न्यापासून वंचित राहतात अशा नागरिकांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश कृष्णा अय्यर यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, मोफत कायदेशीर मदत हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे. एका वकिलांनी याविषयी बोलताना सांगितले कि, फक्त गुन्हेगारी खटल्यांतच नाही तर इतर खटल्यांमध्ये देखील मोफत वकील देण्याची सुविधा आहे. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर मदत मिळत नाही. खुनाच्या खटल्यात सरकारी वकील दिला जातो. मात्र इतर खटल्यांमध्ये ‘एमिकस क्यूरी’ म्हणजेच मोफत वकील मिळाल्याच्या घटना खूप कमी घडल्या आहेत.

या नागरिकांना मिळतो मोफत वकील

१) अनुसूचित आणि जमातीच्या नागरिकांना

२) भिकारी किंवा मानवी तस्करीचे शिकार झालेली व्यक्ती

३) महिला, लहान मुले आणि अपंग व्यक्ती

४) प्राकृतिक घटनांचे शिकार झालेल्या व्यक्ती भूकंप, पूर, दुष्काळ इत्यादी

५) जातीय हिंसेचे शिकारी

६) औद्योगिक अपघातात जखमी कामगार

७) बाळ सुधार गृहातील मुले किंवा मानसिक रोगी

८) ज्या व्यक्तीची वार्षिक कामे २५ हजारापेक्षा कमी आहे असा व्यक्ती

या ठिकाणी साधा संपर्क

जर तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही मोफत वकिलाची मागणी करू शकता. यासाठी तुम्हाला नॅशनल लीगल सर्विस अथॉरिटी किंवा त्यांच्या https://nalsa.gov.in/lsams या वेबसाईटवर संपर्क साधावा लागेल. तर राज्याकडून मदत मिळवण्यासाठी तुम्हाला स्टेट लीगल सर्विस अथॉरिटी किंवा https://nalsa.gov.in/state-lsas-websites या वेबसाईटवर संपर्क साधावा लागेल.