मिथुन चक्रवर्तीचा मुलगा नमाशी करणार ‘या’ चित्रपटातून पदार्पण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता व डान्सर मिथून चक्रवर्ती याने चाहत्यांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. प्रसिद्ध असणारा अभिनेता मिथून याचा मुलगा नमाशी चक्रवर्ती सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नमाशी पहिल्याच चित्रपटात ‘बॅड बॉय’ मध्ये अभिनेत्री अमरीन कुरेशीसोबत काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव सगळ्यांसमोर आले आहे.

‘बॅड बॉय’ चित्रपटाची कथा नेमकी काय असेल ? हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची शुटिंग कुठे असेल याची देखील अजून माहिती मिळाली नाही पण चित्रपटाच्या नावावरुन कळून येते की, या चित्रपटाची कथा बॅड बॉयवर आधारित आहे. याधी अशा चित्रपटांची कथा होऊन गेली होती. त्या चित्रपटाचे नाव ‘गुड बॉय और बेड बॉय’ असे होते. या चित्रपटात अभिनेता इमरान हाशमी आणि तुषार कपूर यांनी मुख्य भूमिकेत काम केले होते.

आता नमाशी चित्रपटातून कशाप्रकारे आपले स्थान चाहत्यांच्या मनात निर्माण करेल हे पाहणे उत्सुकतेचे बनणार आहे. आपल्या वडिलांप्रमाणे तो ही आपले नाव बॉलिवूडमध्ये टिकवू शकेल का ? याचा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.