‘मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या’ सकल मराठी समाजाची मागणी

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन
सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणाच्या हालचाली सुरू असताना, आता मुंबई विद्यापीठाच्या नामकरणाची मागणी जोर धरत आहे. मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराच यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सकल मराठी समाजाच्या वतीने पुण्यात करण्यात आली आहे.

सकल मराठी समाजाच्यावतीने पुण्यात बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सकल मराठी समाजाचे समन्वयक राजेश खडके म्हणाले छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य राज्यातील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. तसेच त्या काळी त्यांचे अनेक भाषेवर प्रभूत्व होते. ते उत्तम कवी, अाणि अभ्यासक होते. त्यांचे हे कार्य लक्षात घेता राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. केलेल्या मागणीची दखल लवकरात लवकर घ्यावी, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.