मुंबईराजकीय

मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे नाव ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील इस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे. मुंबईतील इस्टर्न फ्री वे या महामार्गाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख याचे नाव देण्यात येणार असल्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नगर विकास विभागाला या संबंधित सूचना दिल्याचे देखील सांगण्यात आले आहे. या संबंधित कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना नगर विकास विभागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

यावर बोलताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि आमदार अमित देशमुख यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितले की या संबंधित अधिकृत माहिती आमच्याकडे आलेली नाही. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत असा काही निर्णय घेतला असेल तर स्वागतच आहे, आनंद देखील आहे आणि असा काही निर्णय झाला असेल तर त्यांचे आभार.

या आधी काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर समृद्धी महामार्ग हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्पाचे नाव बदलून देखील बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्ग करण्यात आले आहे.

भाजपकडून या महामार्गाला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हा प्रस्ताव मोडीत काढत नव्या सरकारने मुंबई ते नागपूर या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्ग असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –

Back to top button