फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘समृद्धी’चे नाव बदलणार, ‘बाळासाहेब ठाकरें’चे नाव देणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – समृद्धी महामार्ग हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरु असले तरी त्यात आता भर पडली आहे ती महामार्गाचे नवे नामकरण करण्याची. भाजपचे सरकार गेल्यानंतर आता महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर आता नव्या सरकारकडून महामार्गाला नवीन नाव देण्याचा घाट घातला आहे. यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.

भाजपकडून या महामार्गाला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र आता हा प्रस्ताव मोडीत काढत नव्या सरकारने मुंबई ते नागपूर या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्ग असे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आता याची फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

याआधी भाजप सरकार असताना या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना केले होते. तेव्हा फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या नावावरुन वाद नको, त्याचे नाव आधीच निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ही शक्यता मावळली होती की महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्यात येईल.

आता ठाकरे सरकार राज्यात सत्तेत आहे. त्यामुळे आता शिवसेनेची समृद्धी महामार्गाच्या नामकरणाची मागणी मान्य होणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Visit : Policenama.com