कोथरूड, शिवाजीनगर, कसबा आणि भोसरीतून वंचितच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यामध्ये 22 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. उमेदवारांची यादी प्रकाश आंबेडकर यांनी प्रसिध्द केली आहे. दरम्यान, वंचित आघाडीने पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.

पुण्यातील कोथरूड मतदार संघातून दिपक नारायण शामदिरे, शिवाजीनगर मतदार संघातून अनिल शंकर कुर्‍हाडे, कसबा पेठ मतदार संघातून मिलिंद ई. काची तर भोसरी मतदार संघातून शहानवाला जब्बार शेख यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आघाडी आणि युतीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्यापुर्वीच वंचित आघाडीने पुणे शहरातील 3 आणि भोसरीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यानंतर निवडणूकीचे वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे.

दरम्यान, आघाडी आणि युतीकडून पुणे आणि परिसरातील मतदार संघाचे जागा वाटप अद्याप देखील नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दोनच दिवसांपुर्वी पुण्यातील चार मतदार संघातून राष्ट्रवादी लढणार असल्याचे जाहीर कार्यक्रमादरम्यान सांगितले होते त्यावर काँग्रसेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

Visit : policenama.com