नरेंद्र मोदींना भेटायचंय ? पाच रुपये आहेत ? मग तुम्ही मोदींना भेटू शकता…

दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचं आहे तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आता तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता सहज भेटू शकता. काय करावे लागेल यासाठी ? जास्त काही नाही तर तुम्हाल फक्त पाच रुपये खर्च करावे लागणार आहे. इतकेच नाही तर तुम्ही पाच रुपये दिल्यानंतर तुम्हाला एक टी शर्ट आणि त्यासोबतच एक काॅफी मगदेखील मिळू शकतो. आणि मुख्य म्हणजे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. यासाठी तुम्हाला एवढंच करावं लागेल. तुम्हाला नमो हे अॅप डाऊनलोड करावं लागेल आणि त्यावर डोनेशन द्यावे लागेल. पंतप्रधानांच्या वैयक्तिक नरेद्र मोदी (नमो) अॅपवर भारतीय जनता पक्षाला डोनेशन द्यावे लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त पाच रुपये नाही तर तुम्ही पाच रुपयांपासून ते जास्तीत जास्त 1000 रुपयांपर्यंत हे डोनेशन येऊ शकता.
गेल्याच महिन्यात  ‘नरेंद्र मोदी अॅप’द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाला एक हजार रुपयांची देणगी दिली होती. इतकेच नाही  तर जनतेनेही भाजपाला आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले. मुख्य म्हणजे ‘तुमच्या आर्थिक सहकार्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्याचा देशसेवेचा निश्चय दृढ होईल’, असे मोदींनी म्हटले होते.
नेमके काय करावे लागेल ?
प्रथम नमो अॅप तुमच्या स्मार्टफोनवर इन्स्टाॅल करा. त्यानंतर तुम्ही पैसे नमो अॅपच्या सहाय्याने डोनेट करा. यानंतर तुम्हाला एक रेफरल कोडही मिळेल. हा कोड तुम्हाला व्हाट्सअॅप किंवा एसएमएसच्या सहाय्याने १०० लोकांना पाठवायचा आहे. यानंतर तुम्ही पाठवलेल्या १०० लोकांनी जर तुमचा रेफरल कोड वापरून नमो अॅपला डोनेशन दिले तर तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळू शकते. तुमची ही संधी हुकली तरी तुम्ही रेफरल कोड पाठवलेल्या १०० लोकांपैकी जर १० लोकांनी तुमचा रेफरल कोड वापरून जरी डोनेशन दिले तर तुम्हाला एक नमो टी-शर्ट आणि एक कॉफी मग मिळणार आहे.
‘नरेंद्र मोदी अॅप’द्वारे जनतेला भाजपाला देणगी देता येणार आहे. कमीत कमी पाच रुपयांपासून ते जास्तीत जास्त  एक हजार रुपयांपर्यंतची देणगी तुम्हाला या अॅपद्वारे देता येणे शक्य होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन जनतेला आवाहन केले होते. जनतेने भाजपाला देणगी द्यावी आणि कारभारात पारदर्शकतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवावा. तुमचा पाठिंबा आणि योगदान आमच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा देशसेवेचा निश्चय दृढ करेल, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.