Namrata Sambherao | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने भावासाठी लिहिली ‘ही’ खास पोस्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – ‘डॉली’ हे पात्र म्हटलं की आपोआप ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) समोर दिसते. कॉमेडी क्वीन म्हणून नम्रताने स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये एकापेक्षा एक सुंदर पात्र साकारून ती प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसण्यास भाग पाडते. आता नम्रताची (Namrata Sambherao) एक पोस्ट सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे.

 

नम्रता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. नुकताच तिने तिच्या भावासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टमुळे तिच्यात आणि तिच्या भावातील प्रेम व्यक्त होताना दिसत आहे. नम्रताने पोस्टमध्ये भावासोबत दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत अगदी सुंदर असे कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये नम्रताने म्हटले की, “दादा तू या जगातील सगळ्यात जास्त श्रीमंत माणूस आहेस. तुझ्या या दोन लेकीदेखील खूप श्रीमंत आहेत की तू त्यांचा बाबा आहेस. आज तुझ्या या वाढदिवसा दिवशी आपला सर्वात जुना दहा वर्षांपूर्वीचा माझ्या लग्नातील फोटो जेव्हा मी तुला पहिल्यांदा मिठी मारली होती ती आठवण म्हणून शेअर करत आहे. ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते की, तू सगळ्यांचा सांभाळ व्यवस्थित करण्यासाठी तुला ताकद मिळो आणि तुझ्या या वाढदिवसा दिवशी अगणित शुभेच्छा खूप प्रेम दादा”.

Advt.

सध्या नम्रताने (Namrata Sambherao) शेअर केलेल्या या पोस्टवर तिचे अनेक चाहतेदेखील तिच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
तर नम्रतानी आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये तिचे स्थान टिकवून ठेवले आहे.
महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या नव्या पर्वातही ती वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे,
तर अभिनेते जॉनी लिवरदेखील तिचे फॅन आहेत.

 

Web Title :- Namrata Sambherao | maharashtrachi hasyajatra fame namrata sambherao special post for elder bother on his birthday

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nilesh Lanke | भाजपच्या “या” नेत्याच्या आश्वासनानंतर महामार्गाच्या दुरुस्तीसाठीचे नीलेश लंकेंचे उपोषण मागे

Pune Lonavala Local | कामशेत स्थानकाच्या कामामुळे पुणे लोणावळा मार्गावरील अनेक लोकल रद्द

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ९५,०००!; मोदी सरकारची नववर्षातील भेट

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 89 जणांवर कारवाई