Namrata Shirodkar | महेश बाबूला मराठीत बोलता येते का? या प्रश्नावर नम्रता शिरोडकरने दिले ‘हे’ उत्तर

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Namrata Shirodkar | बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर आज 22 जानेवारीला तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. नम्रताचा जन्म 22 जानेवारी 1972 रोजी एका मराठी कुटुंबात झाला. नम्रताला सुरुवातीपासूनच मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड होती. नम्रतानं 1993 मध्ये फेमिना मिस इंडिया ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. नम्रता शिरोडकरने आपल्या सिने कारकिर्दीत अलबेला, वास्तव, जब प्यार किसीसे होता है, पुकार, कच्चे धागे यांसारख्या मोजक्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘शिर्डी के साईबाबा’ सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं होतं.पण या मोजक्याच चित्रपटात तिला एक वेगळी ओळख मिळाली. (Namrata Shirodkar)

 

नम्रता शिरोडकर हिनं दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू याच्याशी 10 जानेवारी 2005 ला लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला.2000 मध्ये ‘वामसी’ चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. विशेष म्हणजे यासाठी तिनं अभिनय क्षेत्र सोडण्याचं ठरवलं. करिअर सोडण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा तिच्या चाहत्याना मोठा धक्का बसला. नम्रता शिरोडकर सध्या सिनेसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. काही वर्षांपूर्वी नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर “मला काहीही विचारा (Aask me anything) ” द्वारे चाहत्यांशी संपर्क साधला होता. (Namrata Shirodkar)

यावेळी तिला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. याची तिने फार चांगल्या पद्धतीने उत्तर दिली.
यादरम्यान एका चाहत्याने नम्रताला ‘महेशबाबू मराठीमध्ये बोलू शकतात का?’ असा प्रश्न विचारल्यावर तिने त्यावर मजेशीर उत्तर दिले.
या उत्तराबरोबरच तिने तिच्या मनातील इच्छाही बोलून दाखवली. या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली,
“माझीसुद्धा फार इच्छा आहे. पण माझ्या दोन्हीही मुलांना मराठी येते.
त्याबरोबरच त्यांना इंग्रजी आणि तेलुगू भाषाही बोलता येते.” महेश आणि नम्रताला एक मुलगा आणि एक मुलगी असून गौतम आणि सितारा अशी त्यांची नाव आहेत.

 

Web Title :- Namrata Shirodkar | namrata shirodkar birthday here what mahesh babu wife said when asked if he knows to speak marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | ‘पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षाध्यक्ष असावा, घरात बसून…’, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाला उद्धव ठाकरे जाणार? आदित्य ठाकरे म्हणाले…

Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान