पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नाना काटे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांना याबाबत पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आले. या अर्जावर सूचक म्हणून नगरसेवक जावेद शेख यांची तर अनुमोदक म्हणून मोरेश्वर भोंडवे यांची स्वाक्षरी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या आदेशानंतर ही नियुक्ती झाली असल्याची माहिती शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी दिली.

यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक राजू मिसाळ, राजू बनसोडे, जावेद शेख, मोरेश्वर भोंडवे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेता हा स्मार्ट सिटीचा पदसिद्ध संचालक असतो. त्यामुळे हे पद मानाचे आहे. पहिल्यावर्षी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील योगेश बहल यांना तर दुस-या वर्षी भोसरी मतदारसंघातील चिखलीचे प्रतिनिधित्व करणारे दत्ता साने यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते. तिसऱ्या वर्षी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली आहे. काटे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म आहे.

आरोग्यविषयक वृत्त –