
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचा दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरव
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे नाव आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचे संवादफेक, देहबोली, हावभाव हे साऱं चाहत्यांच्या मनाला थेट भिडते. यामुळे नानांचा (Nana Patekar) मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या याच अभिनयामुळे नानांचा नुकताच मास्टर दीनानाथ मंगेशकर (Master Dinanath Mangeshkar) स्मृती प्रतिष्ठानच्यावतीनं सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह संगीत, नाटक, कला आणि सामाजिक कार्यामध्ये धडाडीनं काम करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यावेळी गौरवण्यात आले.
विलेपार्ल्यातील एका सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यामध्ये दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात संगीतकार प्यारेलाल शर्मा (Pyarelal Sharma) यांना प्रदान करण्यात आला. तसेच संगीत क्षेत्रातील योगदानासाठी दीनानाथ पुरस्काराने उषा मंगेशकर यांना सन्मानित करण्यात आले. यासोबत मीना मंगेशकर (Meena Mangeshkar) यांना आणि सिनेमा क्षेत्रातील योगदानासाठी प्रेम चोप्रा (Prem Chopra) यांनासुद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे खासदार आणि संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनासुद्धा यावेळी सन्मानित करण्यात आले.
साहित्य क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या संतोष आनंद (Santosh Anand) यांना वाग्विलासिनी पुरस्कार (Wagvilasini Award) प्रदान करण्यात आला.
यासोबत कवयित्री नीरजा (Poet Neerja), डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani), डॉ. राजीव शर्मा (Dr. Rajiv Sharma), डॉ. जनार्दन निंबोळकर (Dr. Janardan Nimbolkar), डॉ. अश्विन मेहता (Dr. Ashwin Mehta),
यांनासुद्धा यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे योगदान मोठे आहे.
त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी मोठी आहे.
त्यांचे काम नेहमीच संगीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असेल असे पंडित हदयनाथ मंगेशकर (Pandit Hadayanath Mangeshkar) यावेळी म्हणाले. (Nana Patekar)
Web Title :- Nana Patekar | actor nana patekar got master dinanath mangeshkar award
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
IPL 2022 | मुंबई इंडियन्समधून पांड्या बंधूचा पत्ता कट, तीन खेळाडू करणार रिटेन चौथ्यासोबत बोलणी सुरू