जो झूठ हे वो झूठ है…. नाना पाटेकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर बॉलीवूड तसेच इतर सर्वच ठिकाणावरुन उलट सुलट चर्चा चालू झाली होती. मात्र नानाने आता पर्यंत त्यावर मौन बाळगले होते. नानाने आता मौन तोडले आहे. जो झूठ हे वो झूठ है…. अश्या शब्दात नानाने आपली बाजू भक्कम रोवली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5872b6b2-c966-11e8-904b-f5f6efc677f8′]

तनुश्री दत्ता ने एका टीव्ही शो वरील मुलाखती दरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा अआरोप केला होता. या वृत्तानंतर बॉलिवूड तसेच इतर ठिकाणी या प्रकरणा बाबतीत उलट सुलट चर्चा सुरु झाली होती. असे असताना अभिनेते नाना पाटेकर अजूनही आपल्याला धमकावतात त्यांच्याकडून छळ सुरु आहे असा गंभीर आरोपही अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला होता.

नुकतेच शुटिंगसाठी नाना पाटेकर राजस्थानला गेले होते. तेथून ते मुंबई विमानतळावर परतले. यावेळी पत्रकांरानी त्यांना घेराव घातला व तनुश्रीच्या आरोपाबद्दल प्रश्न विचारण्यासाठी झुंबड उडवली. यावेळी नानाने बोलणे टाळले, पर्णातू पत्रकारांच्या त्या प्रश्नांना नानाने जो झूठ हे वो झूठ है…. असे म्हणत बोलणे संपवले. यापुढे बोलताना ते म्हणाले याचे उत्तर मी १० वर्षाआधीच दिले होते. और जो झूठ हे वो झूठ है…. असे म्हणत त्यांनी आपण लवकरच पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी बेड्यासह पसार

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, २००८ साली ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटादरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले असा आरोप तिने मुलाखतीत केला होता. गैरवर्तणुकीचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताला नाना पाटेकर कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. ‘तनुश्रीने केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. तिने खोटी माहिती पुरवली आहे त्यामुळे तिला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ’, अशी माहिती नाना पाटेकर यांचे वकिल राजेंद्र शिरोडकर यांनी दिली आहे.

[amazon_link asins=’B01J82IYLW,B01DEWVZ2C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4c366da3-c967-11e8-ae5a-db9a5795a3c9′]

तनुश्रीने नाना पाटेकर सह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, यांच्यावरही आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या ड्रग्स मुळे तिचे डोके ठिकाणावर नसल्याचे आरोप अभिनेत्री राखी सावंत, तसेच पुणे जिल्हा मनसे महिला शहर अध्यक्षा अॅड.रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केला आहे.

भाजपाने काटोलमध्ये पोटनिवडणूक जिंकून दाखवावी : आशिष देशमुख

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c882906-c967-11e8-b271-ff273d96be04′]

Loading...
You might also like