अमित शाहांच्या भेटीमुळं नानांच्या भाजप प्रवेशाची चर्चा, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने आता नानांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. सध्या अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे भाजपमधील हे इनकमिंग राजकीय क्षेत्रापुरतं न थांबता फिल्मी दुनियेकडेही वळतंय की का असा प्रश्न उपस्थिताना होताना दिसत आहे.

नाना पाटेकर अमित शाह यांना भेटण्यासाठी सोमवारी (दि 19 ऑगस्ट) दिल्लीतील नॉर्थ क्लबमध्ये पोहोचले होते. तब्बल 20 मिनिटे दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. गेल्या काही वर्षापासून नाना नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. या कामानं जोर धरला तेव्हाच ते राजकारणात येणार का याची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली होती.

अमित शाह यांच्या भेटीनंतर नानांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “ही भेट सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांसाठी होती. संस्थेला परदेशातून येणारा निधी स्विकारण्यासाठी एफसीआरए सर्टिफिकेट मिळणं आवश्यक असतं. त्याच्या परवानगी मागण्यासाठी शाह यांची भेट घेतली.” असे नानांनी स्पष्ट केले होते.

नानांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे की, त्यांच्या आणि अमित शाह यांच्या भेटीत कोणताही राजकीय अर्थ नक्कीच दडलेला नसावा. त्यामुळे भाजप प्रवेशाच्या चर्चेत तूर्तास कितपत तथ्य आहे हे सहज लक्षात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like