Nana Patekar | एकेकाळी नाना पाटेकर ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होते ; ‘या’ कारणामुळे झाला ब्रेकअप

पोलीसनामा ऑनलाइन टीम : चित्रपटसृष्टीत दिग्गज कलाकारांपैकी नावाजलेला अभिनेता म्हणजे नाना पाटेकर (Nana Patekar). नाना यांनी जिद्दीने परिश्रमाने स्वतःचे स्थान चित्रपटसृष्टीत रोवले आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकीर्दीत अनेक यशस्वी हिट चित्रपट दिले आहेत. अशा या नानांच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या आहेत. आज नाना (Nana Patekar) त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

 

 

 

1 जानेवारी 1951 रोजी रायगड जिल्ह्यात विश्वनाथ पाटेकर यांच्या कुटुंबात जन्म झाला. आता संपूर्ण जग त्यांना नाना पाटेकर या नावाने ओळखते. नानांचे वडील एक छोटा व्यवसाय करत दिवस काढत होते. मात्र त्यांच्या मित्रांनी त्याची फसवणूक करून त्यांच्या मालमत्ते सह सर्व काही त्यांच्या नावावर करून घेतले. यानंतर नानांचे कुटुंब रस्त्यावर आले. त्यामुळे अवघ्या 13 वर्षी नानांना काम करायला लागले. त्यावेळी ते रोज 8 किलोमीटर चालत चुनाभट्टी येथे चित्रपटाचे पोस्टर रंगवायचे. त्यानंतर नानांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत त्यांचे नशीब पालटले.

 

इंडस्ट्रीत आल्यानंतर नाना पाटेकरचे (Nana Patekar) नाव इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्री नेपाळी ब्युटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनीषा कोईराला सोबत जोडले गेले होते. हे दोघे ‘खामोशी : द म्युझिकल’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भेटले होते. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांनी बाप मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते ‘अग्निसाक्षी’ या आणखीन एका चित्रपटात दिसले होते. त्यावेळी त्यांच्या अफेअरची चर्चा संपूर्ण चित्रपटसृष्टीला होती. त्यादरम्यान नाना अनेकदा अभिनेत्रीच्या घरी देखील ये जा करायचे. मात्र हे त्यांचे नाते शेवटपर्यंत टिकू शकले नाही.

त्यांचे नाते शेवटपर्यंत न टिकण्याचे कारण म्हणजे नानांचे विवाहित आयुष्य.
नाना आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायला तयार नव्हते आणि
मनीषा कोईराला नाना पाटेकर यांच्यावर लग्नासाठी सतत दबाव टाकत होती.
यामुळे नाना आणि मनीषा यांच्यात मतभेद झाल्याने त्यांचे ब्रेकअप झाले.
काही दिवसांनी मनीषाने नेपाळी उद्योगपती सम्राट दहलसोबत लग्न केले.
हे लग्न देखील जास्त काळ टिकू शकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला.

 

 

 

Web Title :- Nana Patekar | nana patekar and manisha koirala affair ended due to this reason

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा