Nana Patekar | ‘…तोपर्यंत हे असे पोळी भाजणारे खूप असतील’; ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाबाबतच्या वादावर नाना पाटेकरांचं परखड मत !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patekar | सध्या देशभरात ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये 1990 मध्ये काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandit) आपलं घर सोडून बाहेर पडावं लागलं होतं. ही घटना पडद्यावर दाखवणारा ‘काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट मात्र वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट पडले आहेत. अशातच यावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

मला वाटतं कोणता समाज तेढ करतो अशातला भाग नाही. हे तेढ कोणी जाणूनबुजून निर्माण करत असेल तर त्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारा. सगळे छान सलोख्यानं राहत असताना मध्येच बिब्बा घालायची गरज नाही. यातील वस्तुस्थिती काहींना पटेल किंवा काहींना पटणार नाही. म्हणून यावरून समाजात (Society) तेढ निर्माण होत असतील तर ते योग्य नाही, असं नाना पाटेकर (Nana Patekar) म्हणाले.

 

आपण एकमेकांना आधार (Support) देणं गरजेचं आहे आणि आपण एकमेकांशिवाय राहु शकत नाही. असं दोन्ही समाजांना वाटत नाही तोपर्यंत हे असे पोळी भाजणारे खूप असतील, असंही नाना पाटेकर म्हणाले. पुण्यातील सिम्बायोसिसमध्ये (Symbiosis) झालेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

 

दरम्यान, जर परदेशी व्यक्तीचा विषय असेल तर सर्व भारतीय (Indian) होतात मग फक्त अशावेळीच का जात – धर्म (Caste-Religion) आठवतात ?, असा सवाल नाना पाटेकर यांनी केला.

 

Web Title :- Nana Patekar | nana patekar reaction on the kashmir files controversy hindu muslim pandints issue

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा