×
Homeताज्या बातम्याNana Patole | राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत व्यत्यय आणण्यासाठी पोलिसांचा दुरुपयोग

Nana Patole | राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत व्यत्यय आणण्यासाठी पोलिसांचा दुरुपयोग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात समारोप झाला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ही यात्रा सुरु होईल. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी यांच्या यात्रेत पोलिसांचा दुरुपयोग राज्य सरकारने केल्याचा आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

 

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील ईडी सरकार ही दोन्ही अत्याचारी सरकारे आहेत. अत्याचारी सरकारमध्ये असलेले अधिकारी वर्ग हे देखील अत्याचारी आहेत. त्यामुळे ते सगळीकडे अत्याचार करत आहेत. खासदार राहुल गांधी यांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांना पोलीस धक्काबुक्की करत होते. तरी देखील राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात यशस्वी झाली. पोलिसांनी अनेक प्रकारे आम्हाला मदत केली. त्याबद्दल मी महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानतो.

 

आमच्या यात्रेत बाधा आणण्यासाठी काही लोक प्रयत्न करत होते. त्यात मनसे पक्ष देखील होता.
त्यांना पोलिसांचे सहकार्य मिळत होते. त्यांना गृहमंत्रालयाकडून आदेश आले असले पाहिजेत.
राहुल गांधी यांना महाराष्ट्रात मिळालेला प्रतिसाद त्यामुळे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या पायाखालील वाळू आणि जमीन सरकली आहे.
त्यामुळे त्यांनी या यात्रेला बदनाम करण्याचे, यात्रेत खंड पाडण्याचे प्रयत्न केले.
सत्तेचा आणि तपास यंत्रणांचा दुरुपयोग करणे, हे त्यांच्यासाठी काही मोठे काम नाही,
त्यामुळे त्यांनी तो दुरुपयोग केला, असे यावेळी नाना पटोले म्हणाले आहेत.

 

Web Title :- Nana Patole | Abuse of police to disrupt Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News