Nana Patole | नाना पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी थेट मिडियासमोर; म्हणाला…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole | गेल्या काही दिवसांपुर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीबाबत (PM Narendra Modi) वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राज्यात एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. पटोलेंच्या विधानावरून भाजप (BJP) प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भंडारा येथे बोलताना ‘मी मोदीला मारुही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजप आक्रमक झाला. नाना पटोलेंच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपकडून होतं होती. यानंतर आपण पंतप्रधान मोदी यांना उद्देशून नाही तर एका गावगुंड मोदीबद्दल तसं वक्तव्य केलं असल्याचा खुलासा पटोले यांनी केला होता. दरम्यान, नाना पटोले यांनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी हा आज (शुक्रवारी) थेट मिडियासमोर आला आहे.

 

नाना पटोले (Nana Patole) यांच्या विधानावरुन राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर पटोले विरोधात गुन्हा दाखल करा अशा मागण्या देखील भाजपकडून होत होत्या. दरम्यान आता नाना पटोले यांनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी हा आज थेट मिडियासमोर दाखल झाला. तर नाना पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी आपणच आहोत, असा दावा देखील त्याने केला आहे.

नागपूरमध्ये एका वकिलाने उमेश घरडे (Umesh Gharde) नामक व्यक्तीला मिडियासमोर सादर केलं आहे.
पटोले यांनी ज्या मोदीला उद्देशून शिवी दिली होती. तो हाच मोदी आहे, असा दावा त्यांनी केला.
नंतर स्वत: उमेश घरडे यांनीही सांगितले की, नाना पटोले यांनी जी शिवी दिली ती मलाच दिली.
माझ्यावर काही गुन्हे दाखल आहेत. मात्र मी घाबरलो होतो. त्यामुळे पुढे आलो नव्हतो, असं कथित मोदी याने सांगितलं.
दरम्यान पत्रकारांनी त्या गावगुंड मोदीला सवाल केले असता त्याने व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत.
पटोले यांनी सांगितल्याप्रमाणे प्रचाराला केव्हा आले होते? असा सवाल त्या मोदीला विचारण्यात आला.
त्यावर मोदी काहीच उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे नाना पटोलेंनी उल्लेख केलेला गावगुंड मोदी हाच आहे का ? असा सवाल देखील उपस्थित होताना दिसत आहे.

 

Web Title :- Nana Patole | alleged modi mentioned by nana patole found in bhandara district

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा